एक्स्प्लोर
राहुल फटांगडे हत्या प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात
राहुल फटांगडे हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी सोलापुरातून 21 वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतलं.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी सोलापुरातून 21 वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतलं.
सोलापूरच्या माढा तालुक्यातील टेंभुर्णीतून सुरज रणजीत शिंदेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी पुण्यातील दौंड तालुक्यातील भीमनगरचा मूळ रहिवासी आहे.
राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी
राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रं राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने जारी केली होती. एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रं आणि चलचित्रं जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचं आवाहन सीआयडीने केलं. आरोपींची कबुली विशेष म्हणजे यापूर्वी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमहनगरमधील आहेत. 10 जानेवारीला दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली होती. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली होती. 11 जानेवारीपर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 51 वर पोहोचली होती. नेमकं प्रकरण काय? 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. घरातील पाण्याचा नळ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला. संबंधित बातम्या : 'त्या' चौघांची माहिती देणाऱ्यांना मराठा युवा क्रांतीकडून इनामअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement