(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune weather Update : राज्यात पावसाची शक्यता मात्र पुण्यात तापमानात वाढ होणार; तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यता
. पुण्यातील रात्रीच्या (Weather Forecast) तापमानात काही प्रमाणात घट झाली असून 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे.
पुणे : पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण (Pune Weather Update) जाणवत आहे. पुण्यातील रात्रीच्या (Weather Forecast) तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. शहरात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. तापमान 36 अंशावर राहण्याची शक्यतादेखील वर्तवण्यात आली आहे.
आयएमडी पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांच्या एक्स हँडलवरून मिळालेल्या माहितीनुसार, "आज रात्रीपासून (18 फेब्रुवारी) सक्रिय वारे उत्तर-पश्चिम भारतात धडकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे 17 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पश्चिम हिमालयीन प्रदेशात मेघगर्जनेसह हलका/मध्यम पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काही भाग सोडला तर पुण्यात पावसाची शक्यता नाही. 18 ते 21 फेब्रुवारी दरम्यान अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 दरम्यान हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणेकरांना पुढील काही दिवस उष्णता जाणवणार आहे. राज्यात पावसाची शक्यता आहे पण पुण्यात मात्र उका़डा जाणवणार आहे.
राज्यात पावसाची शक्यता
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या हवामान अंदाजानुसार, पुढील 48 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात काही भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आयएमडी (IMD) च्या अंदाजानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये 18 ते 20 फेब्रुवारी, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर राज्यांमध्ये 19 ते 21 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, देशात 18 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल पाहायला मिळणार आहे. काश्मीर खोऱ्यातही पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाखमध्ये 18 ते 22 या काळात पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
इतर महत्वाची बातमी-