Pune Weather Forecast : पुण्यात रात्री गारठा अन् दिवसा उष्णता; पुढील काही दिवस पुण्याचं वातावरण कसं असेल?
पुण्यात तापमान रात्री गार आणि दिवसा उष्ण जाणवत आहे. पुण्यातील रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली असली तरी दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअसने वाढले आहे
पुणे : पुण्यात तापमान रात्री गार आणि (Pune News) दिवसा उष्ण जाणवत आहे. पुण्यातील रात्रीच्या तापमानात सरासरीपेक्षा (Pune Weather Update) लक्षणीय घट झाली असली तरी दिवसाचे तापमान (Weather Forecast) सरासरीपेक्षा 4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. परिणामी गेल्या तीन दिवसांपासून शहरात थंडी आणि उष्ण दिवस जाणवत आहेत. यंदा किमान आणि कमाल तापमान प्रमाणापेक्षा अधिक राहिल्याने शहरात थंडीचा फारसा अनुभव आलेला नाही. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) आकडेवारीनुसार, फेब्रुवारीपासून सरासरी किमान तापमान 16 अंश आहे, तर सरासरी कमाल तापमान 35 अंश आहे, हे तापान दोन्ही 4 अंशांनी अधिक आहेत.
शनिवार, 13 फेब्रुवारी रोजी कमाल तापमान 34 .8 अंश सेल्सिअस होते, जे सामान्य 4 अंशांनी अधिक होते. मात्र, शिवाजीनगर येथे किमान तापमान 12.4 अंश सेल्सिअस नोंदले गेल्याने रात्रीचे तापमान घसरले. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात फरक असल्याने नागरिकांना सर्दी खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे.
लवाळे येथे कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. लोहगाव 36.4, मगरपट्टा 36.1 अशी नोंद झाली. पाषाण येथेही तुलनेने अधिक म्हणजे 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड वारे राज्यात प्रवेश करतात, त्यामुळे रात्रीचे तापमान कमी होते, तर दक्षिण पूर्वेकडील वाऱ्यांमुळे येणारा ओलावा तापमान वाढण्यास कारणीभूत ठरतो, असं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
पुढील काही दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?
14 फेब्रुवारी- आकाश निरभ राहण्याची शक्यता आहे.
15 फेब्रुवारी- आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
16 फेब्रुवारी- आकाश निरभ राहण्याची शक्यता आहे.
17 फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
18 फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
19फेब्रुवारी- आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यातील पहाटेचा गारवा ऊबदार वाटण्याची शक्यता
सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस सुरू आहे, मात्र पावसाळी वातावरण मावळल्यानंतर साधारण 13 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी गायब होईल, आणि त्याचा परिणाम शेतपिकावर जाणवेल. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात जाणवणारा पहाटेचा गारवा ऊबदार वाटण्याची शक्यता आहे. अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमानसरासरी इतकेच जाणवेल. असं मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केलंय
इतर महत्वाची बातमी-