एक्स्प्लोर
पुण्यात मुळा-मुठा नदीपात्रात दोन शालेय मुलींचे मृतदेह
पुणे : दोन शालेय मुलींचे मृतदेह मुळा मुठा नदीच्या पात्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी मृत्यूचं गूढ कायम आहे.
16 तारखेला वडगाव परिसरातील चार मुली काही मित्रांसोबत फिरायला गेल्या होत्या. त्यापैकी दोघी मुली घरी परतल्याच नाहीत. त्यांचा मृतदेह नदीत दोरीने हातात हात बांधलेल्या अवस्थेत नदीच्या पात्रात आढळला आहे.
स्नेहा मोरे आणि छोटीकुमारी सिंग अशी या मुलींची नावं आहेत. त्यांचा मृतदेह चंदननगरच्या परिसरात आढळला. पालकांच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement