एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पुणे पोलीस आयुक्तांच्या नावे खंडणी; पोलीस निरीक्षकाची फक्त बदली

पुणे: खरं तर खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य. पण पुण्यातल्या पोलिसांना त्याचा विसर पडलेला दिसतो. कारण पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं 25 लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर धुमाळविरोधात गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याच्यावर मेहबानी दाखवली आणि नियंत्रण कक्षात बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.   स्टिंग ऑपरेशन:   धनंजय धुमाळ  - आज संध्याकाळपर्यंत होईल का काम?   तक्रारदार - सर, आता माझ्याकड़े 14 लाख रेडी आहेत   धनंजय धुमाळ - कधीपर्यंत होईल काम?   तक्रारदार - उद्या संध्याकाळपर्यंत 25 पूर्ण करु शकतो सर, फक्त थोडासा प्रॉब्लेम काय झालाय, 1000 आणि 500 च्या नोटांचा..   धनंजय धुमाळ - जास्त आहेत   तक्रारदार - सर, मार्केटमध्ये कॅशचं शॉर्टेज आहे   धनंजय धुमाळ - बर, चल दोन्हीमध्ये कर काही प्रॉब्लेम नाही     पुणे पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे काढणारं स्टिंग ऑपरेशन तक्रारदारानं केलं आहे.   बाणेरमधील सर्व्हे नंबर 90 मध्ये बांधकाम व्यावसायिक संदीप जाधव आणि त्याच्या भागीदारानं जमीन विकत घेतली. पण त्यावरुन वाद सुरु झाला. प्रकरण पोलीस ठाण्यात आलं. त्यानंतर पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळनं संदीप जाधवला मोक्का आणि इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन 25 लाखाची खंडणी मागितली. ती सुद्धा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या नावानं.   खरंतर स्टँडर्ड प्रोसिजरप्रमाणं संदीप जाधवच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक धनंजय धुमाळविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मात्र तसं झालं नाही. उलट रश्मी शुक्ला यांनी धनंजय धुमाळची नियंत्रण कक्षाला बदली करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. इतकंच नव्हे तर धुमाळच्या लाचखोरीवर पुणे पोलीस दलातून कुणीही अवाक्षर काढायला तयार नाही.   धनंजय धुमाळवर रश्मी शुक्लांनी दाखवलेल्या मेहरबानीचं कारणही तसंच आहे. संदीप जाधव आणि हेमंत गांधींनी 80 लाख रुपये स्टँप ड्युटी भरुन बाणेरमधील 15 गुंठे जमीन संजय मुथा यांच्याकडून विकत घेतली.   मात्र संजय वाघमारे आणि राजेंद्र चांदेरे यांनी बाणेरमधील जागा आपली असल्याचा दावा करत न्यायालय गाठलं. दरम्यान मार्च 2016 मध्ये संजय मुथा आणि संदीप जाधव यांच्यातही वाद झाले.  मुथा यांनी चतृ:श्रुंगी पोलिसात जाधव आणि गांधींविरोधात तक्रार दिली. त्यानंतर 30 मे रोजी एटीएसमध्ये काम करणाऱ्या धनंजय धुमाळ यांनी संदीप जाधवला समन्स बजावलं.   खरंतर एटीएसचा आणि जमीन प्रकरणाचा संबंध नसतानाही रश्मी शुक्लांनी हे प्रकरण तपासासाठी धनंजय धुमाळकडे दिलं.   एटीएसमध्ये असलेल्या धुमाळकडे प्रकरण सोपवल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून रश्मी शुक्लांनी धुमाळची बदलीही प्रॉपर्टी सेलला केली आणि त्यानंतर मॅडमना 25 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगून धुमाळ धमकावत राहिला. आता याच मेहरबानीमुळं रश्मी शुक्लांनी धनंजय धुमाळला वाचवण्याचा प्रयत्न सुरु केला नाही ना? अशी चर्चा रंगू लागली आहे.   दरदिवशी होणाऱ्या खून, बलात्कार, दरोड्यांमुळं आधीच गृहखात्याची बेअब्रू झाली आहे. आता तर पोलीस आयुक्तांच्या नावानंच खंडणी घेण्याचं काम सुरु आहे आणि अशा खंडणीखोरांना आयुक्त मॅडम अभयसुद्धा देत आहेत. त्यामुळं या प्रकरणात काय चाललंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्या : 2 Dec 2024 7 PM ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 02 December 2024Ramdas Athwale On Eknath Shinde : अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिंदेंची नाराजी स्वाभाविक- रामदास आठवलेDada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Embed widget