एक्स्प्लोर

केबल्समुळे मुठा कालव्याची भिंत फुटल्याचा अंदाज

कालव्याच्या भिंतीला ज्या ठिकाणी भगदाड पडलं, तिथे केबल्स टाकल्यामुळे भिंत खचल्याचं म्हटलं जात आहे.

पुणे : खडकवासला धरणातून पुणे शहराकडे जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ फुटल्यामुळे सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला. मात्र कालव्याच्या भिंतीला ज्या ठिकाणी भगदाड पडलं, तिथे मातीच्या भिंतीमध्ये केबल टाकण्यात आल्या आहेत. याच केबल्समुळे भिंत खचल्याचं म्हटलं जात आहे. कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यात दोन केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या असल्याची माहिती आहे. कालव्याची भिंत खोदून केबल टाकण्यात आल्याचं दिसत आहे. कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदली असावी, आणि त्यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. नेमकी दुर्घटना काय? पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर आलं. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली. दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं. या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget