(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video: रील्सच्या नादात काय काय करतात! पुण्यात रीलसाठी तरूण-तरूणीचा जीवघेणा स्टंट,पालकांची उडाली झोप; व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील तरूण-तरूणींच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर रील (Instagram Reel) बनवण्यासाठी स्टंट केल्याची माहिती आहे.
पुणे : रिल कल्चरचा (Pune Reels) तरूणाईला एवढा मोह पडलाय की रिल बनवण्याच्या नादात अनेकांना आपल्या जिवाचीही पर्वा राहात नाही. खरंतर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रिल कलेला विकृत रूप येऊ लागलंय का असा सवाल आता उपस्थित होत आहे. पुण्यातील तरूण-तरूणींच्या स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. नऱ्हे परिसारातील स्वामीनारायण मंदिराजवळचा हा व्हिडीओ असल्याचं समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर रील (Instagram Reel) बनवण्यासाठी स्टंट केल्याची माहिती आहे.
साताऱ्यात रीलच्या नादात एक तरुणीने जीव गमावल्याची घटना ताजी असताना आता पुण्यातील हा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रिलच्या आहारी डोकं गहाण ठेवलंय? का असा सवाल लोकांनी उपस्थित करत आहे. पुण्यात नऱ्हे परिसरात स्वामिनारायण मंदिर परिसरात एका उंच इमारतीच्या गच्चीवरून एक मुलगी आपल्या मित्राचा हात धरून लटकली. हात सुटला असता तर ती खोल कोसळली असती. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा
घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. या स्टंटचं चित्रीकरण करण्यासाठी कॅमेरामनसुद्धा तिथे उपस्थित होता. कॅमेरामन वर थांबला असून तरुणीच्या या भयंकर स्टंटचा व्हिडिओ काढत आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे, हे समजू शकलेलं नाही. मात्र, तो आता व्हायरल झाला आहे. पोलिस यावर काही कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे.
मिनिटांच्या रिलसाठी जीव धोक्यात
सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स केली जातात. मात्र यामुळे पालकांची झोप उडाली आहे. प्रत्येक दुनियेचं एक पॅशन असतं. सध्याच्या जगाचं पॅशन सोशल मीडिया झालंय. सोशल मीडियाने क्रिएटिव्हिटीला वाव दिला. मात्र याच सोशल मीडियाने रिल्सनाही जन्म दिलाय. अवघ्या मिनिटांत तुमची क्रिएटिव्हिटी दाखवण्याची संधी मिळाली. मात्र उत्तम काही सादर करण्याऐवजी स्टंटबाजी करून स्वतःचे आणि दुसऱ्यांचे प्राण धोक्यात घालणाऱ्यांची संख्या जास्त झालीय. मिनिटांच्या रिलसाठी जीव धोक्यात घालणारे हे विसरतात की जरा काही बिघडलं तर ते आपल्या जीवावर बेतू शकते. असे प्रयत्न अनेकांच्या जिव्हारी बेतल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आण पाहिल्या असती. तरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.
Video :
हे ही वाचा :
Video : संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत