एक्स्प्लोर

Video : संभाजीनगरमध्ये रील्सच्या नादात तरुणीने गमावला जीव, रिव्हर्स घेताना एक चूक अन कार गेली थेट दरीत

Sambhajinagar Viral Video : मोबाईलवर रिल्स बनवत असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती.

छत्रपती संभाजीनगर : रील्स (Reels)  बनवण्याच्या नादात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. संभाजीनगरच्या खुलताबाद (Chhatrapati Sambhaji Nagar)  तालुक्यात ही घटना घडलीये. श्वेता दिपक सुरवसे ही तरुणी तिच्या मित्राबरोबर सुलीभंजन इथं दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवत होती. तिला कार चालवता येत नव्हती. मी पण आज कार चालवून पाहते असं ती मित्राला म्हणाली. कार रिव्हर्स गिअरमध्ये असताना तिचा पाय अॅक्सिलरेटरवर अधिक दाबानं पडला, त्यामुळे कार डोंगराच्या कडेला जाऊन दरीत कोसळली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. मुळात, कार चालवता येत नसेल तर कधीच तसा प्रयत्न करू नये. त्यातही नवीन ठिकाणी जाऊन डोंगराच्याकडेला कार रिव्हर्समध्ये टाकणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखंच आहे, जे दुर्दैवानं श्वेताच्या बाबतीत खरं ठरलं. 

समोर आलेल्या माहितीनुसार,  श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय 25 रा.हनुमान नगर)  हे छत्रपतीसंभाजीनगर   येथून  सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले.  या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की,  मीपण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून,एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन  खाली गेली यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून,पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17 जून) फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवत असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती. 

रिल्स बनवताना स्वत:चा जीव धोक्यात घालू नका! 

सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात. या रिल्सच्या नादात अनेकदा अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत.  सध्या पावसळा सुरू झाला आहे.  बहुतेक जण यावेळी फोटो किंवा व्हिडीओ काढतात. आजकाल तर रिल्सची चलती आहे. रिल्स बनवण्याचं सध्या ट्रेंड आहे. अनेक वेळा लोक फोटो काढताना, व्हिडीओ किंवा रिल्स बनवताना स्वत:चा जीव धोक्यात घालताना पाहायला मिळतात. असे प्रयत्न अनेकांच्या जिव्हारी बेतल्याच्या बातम्याही आपण ऐकल्या आण पाहिल्या असती. तरीही अशा परिस्थितीत व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.  

Video :

हे ही वाचा :

Pune Accident Video: आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली, अंगावर शहारे आणणारा व्हीडिओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
शिरीष महाराजांच्या डोक्यावरचं ऋण अखेर संपलं! एकनाथ शिंदेंनी 32 लाखांचं कर्ज फेडलं
Parbhani Violence : परभणी बंदला हिंसक वळण, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंचा मृत्यू अन लाँग मार्च; आतापर्यंत काय-काय घडलं?
परभणी बंदला हिंसक वळण, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंचा मृत्यू अन लाँग मार्च; आतापर्यंत काय-काय घडलं?
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 10 February 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सAmit Thackeray भाजपच्या कोट्यातून आमदार? Devendra Fadanvis - Raj Thackeray भेटीत काय-काय ठरलं?CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवरABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
'तुझी बायको खूप सुंदर आहे, लाईट बील कमी करायचं असल्यास माझ्याकडे एकटीला पाठवून दे, कमी करून देतो' शेतकऱ्याला वीज अभियंत्याची 'ऑफर'
Shirish Maharaj Death: शिरीष महाराज मोरेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेलं 32 लाखांचं कर्ज एकनाथ शिंदेंनी फेडलं
शिरीष महाराजांच्या डोक्यावरचं ऋण अखेर संपलं! एकनाथ शिंदेंनी 32 लाखांचं कर्ज फेडलं
Parbhani Violence : परभणी बंदला हिंसक वळण, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंचा मृत्यू अन लाँग मार्च; आतापर्यंत काय-काय घडलं?
परभणी बंदला हिंसक वळण, सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडेंचा मृत्यू अन लाँग मार्च; आतापर्यंत काय-काय घडलं?
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर
Pune: तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
तिकडे देवाभाऊंशी राज ठाकरेंची भेट, पुण्यात राज- उद्धव भावांनी एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी, चर्चेला उधाण
Shrikant Shinde : मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
श्रीकांत शिंदेंचं 78 नव्या आमदारांना जेवणाचं निमंत्रण, ठाकरेंचे 10, पवारांचे 4 आमदार उपस्थित राहणार?
Pune Temperature: देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश;  शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
देशात सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शहराच सरासरी तापमान 35 अंशावर
Pankaja Munde: गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
मुंडे साहेबांवर प्रेम असणारे एकत्र गोळा झाले तर वेगळा पक्ष उभा राहील; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
Embed widget