Pune Crime News: चाकणमध्ये महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा व्हिडीओ समोर, चेहऱ्यावर कृत्याचा लवलेशही दिसेना, हातात फोन अन्...
Pune Crime News: घटनेनंतर आरोपी परिसरातून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सामान्य माणसासारखा तो परिसरात वावरताना दिसतोय, केलेल्या अमानुष कृत्याचा त्या नराधमाच्या चेहऱ्यावरती लवलेश देखील दिसत नाही.

पुणे: पिंपरी शहरात रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार (Pune Crime News) करून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. ही घटना मंगळवारी (ता,13) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चाकण जवळील मेदनकरवाडी येथे घडली आहे. पीडित महिला रात्रपाळीसाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग केला, तिला खंडोबा मंदिराजवळ अडवलं. त्यानंतर जबरदस्तीने (Pune Crime News) तिला ओढत मागच्या बाजूला निर्जनस्थळी नेलं. त्यावेळी महिलेने बचावासाठी आरडाओरडा केला, मदत मागण्याचा प्रयत्न केला. बचावासाठी आरोपीला चावाही घेतला. मात्र, तिच्यावरती बलात्कार करून मारहाण करत कोणाला याबाबत वाच्यता न करण्याची धमकी देत तो पसार झाला. या घटनेनंतर आरोपी परिसरातून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सामान्य माणसासारखा तो परिसरात वावरताना दिसतोय, केलेल्या अमानुष कृत्याचा त्या नराधमाच्या चेहऱ्यावरती लवलेश देखील दिसत नाही.(Pune Crime News)
आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अत्याचाराच्या घटनेनंतर परिसरातून जाताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तो परिसरातून जाताना दिसतो. केलेल्या कृत्याचा जराही लवलेश त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे किंवा कोणतेही हावभाव दिसत नाहीत. हातात फोन घेऊन त्यामध्ये काहीतरी पाहत तो चालताना दिसतो आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी घटनास्थळावरून गेल्यानंतर पिडीत महिलेने परिसरातून एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात असताना त्यांच्या मदतीने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक पथकाची मदत घेण्यात आली आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चाकणमध्ये महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा व्हिडीओ समोर, चेहऱ्यावर कृत्याचा लवलेशही दिसेना, पाहा व्हिडीओ#punenews #Crimenews #Punecrimenews #Chakan #MIDC pic.twitter.com/KRdlUbXeio
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) May 15, 2025
आरडाओरडा केला पण...
पीडितेवर अत्याचार होत असतानाच तिच्यापासून काही अंतरावर काही जण शतपावली करत होते. पीडितेने त्यांना पाहिल्यानंतर मदतीसाठी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, पीडितेचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे पीडितेला कोणाची मदत मिळाली नाही.
24 तासाच्या आत आरोपी अटक
या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणी कठोर कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
























