एक्स्प्लोर

Pune Rain : पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचे थैमान, खडकवासलातून विसर्ग वाढवला, भिडे पूल पाण्याखाली

Pune Rain Update : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसत असल्याने खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले आहे. यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यात टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरण साखळीत 85.59 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल 22 हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल, या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे. 

चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे हा परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. 

खडकवासला धरण साखळीत पावसाचे थैमान

जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस बरसला आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली. खडकवासला धरण साखळीतही पावसाने थैमान घातले आहे. रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच 4,712 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर, धरणांच्या परिसरात संततधार कायम असल्याने रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला. 

खडकवासलातून 22 हजार ८८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग 

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी 9 वाजता 22 हजार 880 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी-अधिक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.  

पानशेत धरणातून 15 हजार 136 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

मुसळधार पावसामुळे पानशेत धरणाच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रविवारी पानशेत धरणातून पहिल्यांदाच 4,712 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. तर आज पहाटे चार वाजता हा विसर्ग 15 हजार 136  क्यूसेकने वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Pune Flood Update : पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली

Pune Rain Update: पुण्यात पुन्हा पावसाला सुरूवात; या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: IPL 2026 Auction Live: कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!

व्हिडीओ

Thackeray Brother Alliance : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची शेवटची सभा ठाकरे बंधू एकत्र घेणार?
Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report
Pune Crime Special Report पुण्यात दहावीतील मुलाची हत्या,  शाळकरी मुलाकडून वर्गमित्राचीच हत्या
Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : संभाजीनगरात शिवसेननेला हव्यात भाजपेक्षा अधिक जागा, भाजप आणि शिवसेनेची बैठक
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: IPL 2026 Auction Live: कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
Latur Crime News: माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Jalgaon Crime : रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
शिवसेनेनं भाजपचा नगरसेवक पळवला, भाजप नेता संतापला; पवार म्हणाले, आमच्याकडेही रांगा
शिवसेनेनं भाजपचा नगरसेवक पळवला, भाजप नेता संतापला; पवार म्हणाले, आमच्याकडेही रांगा
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget