एक्स्प्लोर

Pune Flood Update : पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून मनपा आयुक्तांची मोठी कारवाई; सहाय्यक आयुक्त निलंबित, उपायुक्तांची बदली

Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक महापालिका आयुक्ताचे निलंबित करण्यात आले आहे. तर परिमंडळ तीनच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे.

Pune Flood Update : पुण्यातील पूरपरिस्थिती (Pune Flood) हाताळण्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून सहाय्यक महापालिका आयुक्ताचे निलंबित करण्यात आले आहे. तर परिमंडळ तीनच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश काल (शनिवारी) जारी केले आहेत. संदीप खलाटे असे निलंबित केलेल्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांचे नाव असून परिमंडळ तीनचे उपायुक्त संजय शिंदे यांची बदली करण्यात आलेली आहे. खलाटे यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असून, ती चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर शिंदे यांची बदली करण्यात आली आहे परंतु त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली नाही.

सिंहगड रोड पूरग्रस्त भागात कर्तव्यात कसूर ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना (Pune Flood) सोयीसुविधा पुरविल्या नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांबरोबरच उपायुक्त संजय शिंदे यांचाही पदभार काढून घेतला आहे. गुरुवारी मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर सिंहगड रोड परिसरातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले होते. त्याचा मोठा फटका परिसरातील नागरिकांना बसला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

गुरुवारी पहाटे खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने सिंहगड रस्ता परिसरासह मुठा नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. याबबातची कोणतीही पुर्वसूचना न दिल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला होता. त्यामुळे नदीकाठ परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. सोसायट्या, घरे, दुकाने, बाजारपेठा, वस्त्यांमध्ये, पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले. एबीपी माझाने सिंहगड परिसरातील एकता नगर, निंबजनगर, विठ्ठलनगर या पुरबाधित परिसरातील घटनेची संपूर्ण आढावा घेतला होता.

पुरस्थिती ओसरल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून योग्य पद्धतीने मदत मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी एबीपीकडे देखील केली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले (Rajendra Bhosle) यांनीही विठ्ठलनगर परिसरात पाहणी केली, त्यावेळी पुरबाधित परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल, गाळ, कचरा व अस्वच्छता असल्याचे त्यांना दिसून आले. या भागाचे संदीप खलाटे हे या क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तत्काळ उपाययोजना करणे आवश्‍यक होते. याला जबाबदार धरत त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त डॉ. भोसले यांनी खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
पुण्यातील कॅम्पातून चक्क 800 कोंबड्यांची चोरी, चिकन सेंटरचा मॅनेजर हैराण; पोलिसांत गुन्हा दाखल
FDA Action On Siya Goyal Father Shop Pune Market: सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
सिया गोयलच्या वडिलांच्या अडचणीत वाढ, विनापरवाना दुकान सील; आता भेसळ सिद्ध झाल्यास होणार मोठी कारवाई
Ravindra Dhangekar Khalil Shaikh Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय काय म्हणाले?
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी काय म्हणाले?
Jejuri Warkari Accident Deaths : जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला; उपचारादरम्यान आणखी एका महिलेची प्राणज्योत मालवली

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Maharashtra Dam Water Storage: राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी कुठे किती पाणीसाठा शिल्लक? वाचा सविस्तर
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
'तर मग तिसऱ्या भाषेची काय गरज? नववीच्या विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेचं ओझं टाकू नका, पाचवी किंवा सहावीपासून सुरुवात करा..' सुप्रीम कोर्टाची थेट फटकार
100 ISRO Scientists Quit Their Jobs: अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
अवघ्या 10 महिन्यात इस्रोच्या तब्बल 100 शास्त्रज्ञांचा नोकरीला रामराम! महत्वाकांक्षी गगनयान आणि इतर मोहिमांमध्ये सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश
Embed widget