(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain Update: पुण्यात पुन्हा पावसाला सुरूवात; या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Rain Update: आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Pune Rain Update: पुणे शहर (Pune Rain Update) परिसरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा आज(रविवारी) पहाटेच्या सुमारास काही भागात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्यासह घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुणे शहराला (Pune Rain Update) येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण परिसरात 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस (Heavy Rain Update) सुरू राहणार असून विदर्भात 29 जुलैपासून 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे. विदर्भात सोमवारपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात मध्यम पावसाची शक्यता (Heavy Rain Update) वर्तवण्यात आली आहे. आज (रविवारी) कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाटमाथा विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
येलो अलर्ट:
पालघर (28), ठाणे (27 ते 29), मुंबई (27,28), रायगड (28 ते 30), रत्नागिरी (27 ते 30 ), धुळे (27), पुणे (27 ते 30), कोल्हापूर (27,28), सातारा (28,29), अकोला (27 ते 30), अमरावती (27 ते 30 ), भंडारा (27 ते 30), बुलडाणा (27 ते 30), चंद्रपूर (27 ते 30).
'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईसह ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भात देखील आज पावसाचा (Heavy Rain Update) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
पाणशेत धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर
गेल्या 24 तासांमध्ये धरणसाखळीत 1.45 टीएमसीची पाण्याची भर पडली आहे. खडकवासला धरणात शुक्रवारी सायंकाळी 1.03 टीएमसी म्हणजे (51.99 टक्के) पाणी होते. पाण्याची आवक वाढल्याने खडकवासला पुन्हा शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. खडकवासला धरणमाथ्यावर पावसाचा (Heavy Rain Update) जोर ओसरला आहे. मात्र, पानशेत आणि वरसगाव धरण क्षेत्रातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील डोंगरी पट्ट्यात शुक्रवारी संततधार पाऊस झाल्याने शनिवारी पावण्याची आवक वाढली आहे.