Uddhav Thackeray Vs Shah सत्ताधारी, विरोधकांची एकमेकांवर आरोपाची चिखलफेक, डायलॉगबाजी Special Report
पुढचा महिनाभर महाराष्ट्राचं खूप मनोरंजन होणार आहे... कारण बरोबर एक महिन्यानंतर राज्यभरात महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.. आता प्रचारामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोपाची चिखलफेक करतील.. आणि ही चिखलफेक करताना जोरदार डायलॉगबाजी देखील होईल... गेल्या दोन दिवसांपासून नेत्यांनी त्याचा ट्रेलर देखील दाखवायला सुरूवात केलीय.. गंमत म्हणजे नेत्यांना आपल्या विरोधकांमध्ये अॅनाकोंडापासून नागोबापर्यंत आणि गांडुळापासून रहमान डकेतपर्यंत... सगळ्यांचं दर्शन होऊ लागलंय..
डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफी पाहणाऱ्यांनी, एकदा तरी टीव्ही स्क्रीनवर अॅनाकोंडाचं दर्शन घेतलं असेलच..
तर काहींनी थिएटरमध्ये पॉपकॉर्न खात, सर्प जातीतल्या या भव्य जीवाचं अतिरंजित रूप एन्जॉय केलं असेल...
आता तुम्ही विचाराल की राजकीय शोलेचा आणि अॅनाकोंडाचा नेमका संबंध काय?... तर तसा थेट संबंध काहीच नाही... मात्र महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय नेत्यांना आपआपल्या विरोधकांमध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचं दर्शन घडतंय... सुरूवात झाली ती उद्धव ठाकरेंच्या डायलॉगबाजीनं ... मुंबईच्या खार इथे शिवसेना शाखेच्या उद्घाटनासाठी उद्धव ठाकरे आले होते भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, हा ठाकरेंच्या शिवसेनेचा जुना आरोप... मात्र रविवारी या आरोपाचा पुनरूच्चार करताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अॅनाकोंडाची तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गांडुळाची उपमा दिली
आपल्या दोन बड्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी अॅनाकोंडा आणि गांडुळ म्हटल्यानंतर, महायुतीच्या नेत्यांचं पित्त खवळलं नसतं तरच नवल सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सरपटणाऱ्या प्राण्यांचा उल्लेख असलेली म्हण शोधली आणि उद्धव ठाकरेंना डंख मारला
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेत बोलताना, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा हिशेब व्याजासकट चुकता करण्याचा प्रयत्न केला... एक गोष्ट नक्कीय.. एकतर एकनाथ शिंदेंनी किंवा किमान त्यांना भाषण लिहून देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यानं तरी वेळात वेळ काढून धुरंधर सिनेमा पाहिलाय.. नाहीतर शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर पलटवार करताना रहमान डकैतला मैदानात उतरवलं नसतं
एकनाथ शिंदेंच्या भाषणाताल्या रहमान डकैतचा पत्ता शोधून काढण्याचं काम केलं ते मंत्री आशिष शेलारांनी
All Shows

































