एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील पावसाच्या महत्त्वाच्या घडामोडी
Pune Rain : पुण्यातही पावसाचा जोर आहे. शहरात पाऊस कोसळतोय. शिवाय लोणावळ्यापासून ते खडकवासला धरण परिसरापर्यंत सगळीकडे संततधार सुरु आहे
पुणे : पुण्यातही पावसाचा जोर आहे. शहरात पाऊस कोसळतोय. शिवाय लोणावळ्यापासून ते खडकवासला धरण परिसरापर्यंत सगळीकडे संततधार सुरु आहे. आजची पावसाची स्थिती पाहता उद्याही असाच पाऊस सुरु राहण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात आज पावसाच्या घडलेल्या घडामोडी जाणून घेऊया
पुणे जिल्ह्यातील आजचा पाऊस आणि घडामोडी
- पुणे धरणांतील पाणीसाठा : खडकवासला - 95.51 टक्के, कलमोडी - 100 टक्के, पवना धरण - 49.48 टक्के
- वेल्हे - पानशेत रस्त्यावरील कादवे घाटात काही प्रमाणात दरड कोसळली होती. ती दरड जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला
- डेहणे - नायफड रस्त्यावर दरड कोसळली असून जेसीबीच्या साह्याने दरड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
- आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव लगतच्या धोबी वाडीतील कृषी विभागाचा लहान बंधारा फुटल्याने ओढयातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. सदर ठिकाण धोकादायक असल्याचं सूचित करण्यात आलंय.
- पुणे पानशेत रस्त्यावर सोनपूर जवळ रस्ता खचला आहे. त्या ठिकाणी बोर्ड लावून, बॅरिगेटिंग करून केवळ हलक्या वाहनांना रस्ता सुरू ठेवला आहे.
- आंबेगाव तालुक्यातील कुशिरे खूर्द आणि कुशिरें बु. दरम्यान रस्ता खचला आहे. त्यामुळं सदर रस्ता तात्पुरता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.
- आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालीय आहे. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव बस स्टॉप जवळील जुना पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीकरता बंद करण्यात आला आहे.
- आज दुपारी 1 च्या सुमारास काञज जुना बोगद्याजवळ दरड कोसळली. जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले दगड बाजूला करण्यात आले आहे . सदर रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
- मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील शाळा 16 जुलै पर्यंत बंद राहणार आहेत. मात्र यातून इंदापूर , बारामती , दौड , शिरूर व पुरंदर हे तालुके वगळण्यात आलेत. तेथील शाळा नियमितपणे सुरूच राहतील.
- पुण्यातील शिवणे पुलावरून दोन तरुण वाहून गेले. एकाला वाचविण्यात यश आलं.
- जुन्नर तालुक्यात ओढ्यांना पूर आलाय. त्यात एक व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आलाय.
- कामशेत जवळील इंद्रायणी नदीवरील पूल बंद करण्यात आलाय. आठ गावांचा संपर्क तुटलाय
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
Advertisement