एक्स्प्लोर
Pune Rain Update : 'ब्रेक के बाद' पुण्यात पुन्हा मुसळधार पावसाची हजेरी; पुणेकरांची तारांबळ
पुण्यात काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नवरात्रीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चागंलीच तारांबळ उडाली.
Pune Rain Update : पुण्यात काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने आज संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नवरात्रीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची चागंलीच तारांबळ उडाली. शिवाय चतु:श्रृंगी मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पावसाने झोडपले आहे.
पुण्यात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर मंडप उभारण्यात आले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे या मंडपात देखील पाणी शिरलं आहे. शिवाय शहरातील काही भागात देखील अचानक मुसळधार पाऊस झाल्याने नागरीकांची तारांबळ उडाली आहे. धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, येरवडा परिसरात मुसळधार पाऊस पडला तर शिवाजीनगर परिसरात हलक्या सरी कोसळल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement