एक्स्प्लोर

मोठी बातमी : अजय तावरेला थेट मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण, त्यांच्या जीवाला धोका, सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप

Pune Accident Sushma Andhare:  कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी पुणे अपघात प्रकरणाचे खुलासे 4 जूननंतर करणार असल्याचा इशारा सुषमा इशारा अंधारेंनी (Sushma Andhare)  दिला आहे.  

Pune Accident Sushma Andhare:  पुण्याच्या कल्याणीनगरमधील (Pune Accident)  पोर्शे कार अपघात प्रकरणात ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली.  डॉ. अजय तावरे (Ajay Taware) आणि डॉ. हळनोर  यांच्या जीविताला धोका आहे.  4 जूनला लोकसभा निकालानंतर गौप्यस्फोट करणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या पुण्यात बोलत होत्या.  कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि पोलिसांवरचा ताण कमी व्हावा, यासाठी खुलासे 4 जूननंतर करणार, असल्याचा  इशारा सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)  दिला आहे.  

पोर्शे अपघात प्रकरणात अनेक मोठे प्रस्थ गुंतले आहेत. 12 तासाच्या आत जामीन मिळाला, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या झाल्या. रक्ताचे सॅम्पल बदलू शकतात, आरोपील  वाचवायचे प्रयत्न होऊ शकतात तर पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेच्या जीवाला धोका का होणार नाही.  आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ तर आहेच. पण या सगळ्या संबंधाने विचार  केला तर निश्चितच तावरेंच्या जीवाला धोका आहे. अजय तावरे हा रक्ताचे नमुने बदलणे, यापुरते मर्यादित नाही. गेल्या दहा वर्षात तावरेंनी काय-काय पाहिलं, मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारेंनी केला आहे.  

काही धक्कादायक खुलासे 4 जूननंतर करणार: सुषमा अंधारे 

सुषमा अंधारे म्हणाल्या,  मी एक पोस्ट केली आहे, जे बोलायचं आहे ते 4 जून नंतरच बोलेन. सध्या पोलिसांवर बराच ताण आहे, त्यांच्यावर अधिकचा ताण वाढवायचा नाही. त्यामुळं चार जून नंतरच मी त्या पोस्टवर बोलेन.  डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हरनोर यांच्या जीवाला धोका असू शकतो, पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यायला हवं, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. आर्यन खान आणि सिंघानिया प्रकरण असो की नवाब मलिक प्रकरण असो या प्रकरणातील जे  व्हिटनेस  आहेत. त्यांच्यासोबत काय घडलं याची सर्वांना कल्पना आहे. अशा परिस्थितीत डॉ. तावरे पोर्शे कार अपघात प्रकरणात महत्वाचे विटनेस आहेत. त्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे.

ब्लर केलेले चेहरे कोणाच्या मुलांचे? सुषमा अंधारेंचा सवाल

सुनील टिंगरे खोटं बोलले, शिफारस पत्राने हे सिद्ध झालं. खुलादा देण्याची वेळ सुनील टिंगरेंवर का आली? नेहमी एका आमदारांची चर्चा या प्रकरणात होते. पबमधील व्हिडीओ समोर आला. त्यात काही चेहरे ब्लर केले आहेत. ते ब्लर चेहरे कोणाचे आहे याची माहिती समोर आली पाहिजे, असे सुषमा अंधारे म्हणाले.  

गृहमंत्री पद माझ्याकडे द्या, मी सगळं बाहर काढते : सुषमा अंधारे 

विरोधकांनी राजकारण करू नये, हे सांगण्यात देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही वेळ का घालवता? पोर्शे अपघात प्रकरणी इथं येऊन का खुलासा करत नाही? विरोधकांनी काय करावं यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी काय करावं हे त्यांनी सांगावं. गृहमंत्री पदाची जबाबदारी माझ्याकडे द्या, मी तावरेंशी कोण-कोण बोललं हे समोर काढते, असे देखील  सुषमा अंधारे म्हणाल्या. 

Video :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Samadhan Sarvankar vs Mahesh Sawant :  दादरच्या फुल मंडईतील बँनर काढल्यानं समाधान सरवणकर आणि महेश सावंत यांच्यात वादABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 08 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
NCP Sunil Tatkare: बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
बाप-लेकीला बाजूला राहू दे, तुम्ही इकडे या! सुनील तटकरेंनी शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर दिल्याचा दावा
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
Embed widget