एक्स्प्लोर

Ajit Gavhane: अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? अजित गव्हाणेंनी दिलं उत्तर, म्हणाले 'सत्ता असूनही...'

Ajit Gavhane: माजी आमदार विलास लांडेंचे समर्थक आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आज शरद पवारांची तुतारी हातात घेणार आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ही शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

Ajit Gavhane: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांना (Ajit Pawar) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार विलास लांडेंचे समर्थक आणि अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आज शरद पवारांची तुतारी हातात घेणार आहेत. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ही शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशाआधी अजित पवार गटाचे माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दादांची साथ सोडून शरद पवारांसोबत (Sharad Pawar) जाण्याचा निर्णय का घेतला याबाबत एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.

शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय का घेतला?

अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी चिंडवडमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे काम झालं होतं. गेल्या २०१७ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची सत्ता आली. तेव्हापासून पिंपरी चिंचवड शहराची मोठ्या प्रमाणावर अधोगती झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे भोसरी विधानसभा हा भाग सर्वांत जास्त मागे पडलेला आहे. सत्ता असताना देखील काही विकासकामे झालेली नाहीत. एकहाती सत्ता अजित पवारांकडे (Ajit Pawar) नव्हती. त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती दिसून येत आहे, त्यामुळे आम्ही अजित दादांना सोडून शरद पवारांसोत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अजित गव्हाणे यांनी सांगितलं आहे. 

भोसरी विधानसभेचा चुकीच्या पध्दतीने विकास झाला. पैसे खर्च करून देखील काही उपयोजना दिसत नाहीत. येथे नियोजनबध्द पध्दतीने विकास करणे गरजेचे आहे. पुढची ५० वर्षे डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. तर मी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे, मी गेल्या काही वर्षांपासून यासाठी प्रयत्न देखील करत आहे. त्या दृष्टीकोनातून मी अनेक दिवस झाले प्रयत्नशील होतो. त्याप्रमाणे मी काम देखील करत होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

भारतीय जनता पक्षासोबत याठिकाणी काम करण्यास मी इच्छुक नाही, अजित पवार (Ajit Pawar) पालकमंत्री असताना देखील शहराचा विकास झालेला नाही, त्याचबरोबर आगामी विधानसभा लढवण्याच्या अनुषंगाने ते शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत जात असल्याचं त्यांनी एबीपीशी बोलताना सांगितलं आहे. 

आज शरद पवारांची तुतारी फुंकणाऱ्यांची नावं

अजित गव्हाणे- शहराध्यक्ष
राहुल जाधव - कार्याध्यक्ष
हनुमंत भोसले - माजी महापौर
वैशाली घोडेकर - माजी महापौर
समीर मासुळकर - माजी नगरसेवक
पंकज भालेकर - माजी नगरसेवक
समीर वाबळे - माजी नगरसेवक
गीता मंचरकर - माजी नगरसेवक
वैशाली उबाळे - माजी नगरसेवक
शुभांगी बोऱ्हाडे - माजी नगरसेवक
विनया तापकीर - माजी नगरसेवक
संगीता ताम्हाणे - माजी नगरसेवक
रवींद्र सोनवणे - (पती, माजी नगरसेविका दिवंगत पौर्णिमा सोनवणे)
यश साने - पुत्र, दिवंगत नगरसेवक दत्ता साने
वसंत बोऱ्हाटे - माजी नगरसेवक
संजय नेवाळे - माजी नगरसेवक
प्रवीण भालेकर - माजी नगरसेवक
निवृत्ती शिंदे - माजी अध्यक्ष, शिक्षण मंडळ

VIDEO - दादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय काय घेतला? अजित गव्हाणेंनी सांगितलं कारण

संबधित बातम्या: Ajit Pawar vs Sharad Pawar : शरद पवारांची अजितदादांना पुन्हा धोबीपछाड, दादांच्या बालेकिल्ल्यातील शहाराध्यक्षांसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 20 जुलैला तुतारी फुंकणार

Sharad Pawar : अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शरद पवार गटात 'या' बड्या नेत्यांचा आज होणार पक्षप्रवेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; तिन्ही पक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार?
महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; काँग्रेसचा दावा ठाकरे-पवारांना मान्य होणार?
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणावABP Majha Headlines : 11 AM : 18 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha  : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 18 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailash Darshan With MI-17 : थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
थेट MI-17 हेलिकॉप्टरने कैलास दर्शन करा! फक्त किती हजारात प्रवास अन् कोणत्या वर्षांपर्यतच्या व्यक्तींना प्रवास करता येणार?
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; तिन्ही पक्षांना किती आणि कोणत्या जागा मिळणार?
महाविकास आघाडीची आजपासून जागावाटपावर बैठक; काँग्रेसचा दावा ठाकरे-पवारांना मान्य होणार?
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
Job Update: सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात आहात? उत्तर मध्य रेल्वेत 1679 पदांसाठी भरती सुरु, 10 वी पासलाही करता येणार अर्ज
Bigg Boss Marathi Season 5 Riteish Deshmukh : महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
महेश मांजरेकर चांगले होस्ट पण...; रितेशच्या निवडीवर 'बिग बॉस मराठी'च्या 'मास्टरमाइंड'ने मौन सोडलं...
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Embed widget