(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : अजित पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; शरद पवार गटात 'या' बड्या नेत्यांचा आज होणार पक्षप्रवेश
Sharad Pawar : आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
Sharad Pawar : राज्याच्या राजकारणात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची साथ सोडली. पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे काल (मंगळवारी) सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. तर काल राजीनामे दिलेले पदाधिकारी आज शरद पवार (Sharad Pawar) गटात पक्षप्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष आणि भोसरीतील माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी आपल्या पदाचा काल राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच, नेहरूनगर येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, ताथवडे येथील माजी नगरसेवक आणि पक्षाचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष आणि चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते यश साने यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा काल (मंगळवारी) दिला आले. ते सर्व अजित पवारांचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या या निर्णयाने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
अजित गव्हाणे यांनी काही माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तेव्हापासून ते सर्व नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या नेत्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची साथ सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांचा पक्षप्रवेश ते शरद पवार यांच्या पक्षात जाणार असल्याते निश्चित झाल्याचे मानले जात होते. आज(बुधवारी) ते सर्व नेते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले नेते परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा आता सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत मोठं यश
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाला मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं होतं. तर शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या आठ उमेदवारांचा मोठा विजय झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या मोठ्या पराभवानंतर पुन्हा नव्या जोमाने आगामी विधानसभेत विजय मिळवण्यासाठी अजित पवार गटासह महायुतीमधील घटकपक्ष कामाला लागले आहेत. अजित पवारांनी दोन दिवसांपुर्वी बारामतीत मेळावा घेत निवडणुकीची तयारी सुरू केली अशातच पिंपरी चिंचवडमध्ये काही पदाधिकारी अजित पवारांची साथ सोडली आहे.
शरद पवार यांच्या पक्षात आज कोणत्या नेत्यांचा होणार पक्षप्रवेश?
अजित गव्हाणे
समीर मासुळकर
राहुल भोसले
पंकज भालेकर
दिवंगत दत्ता साने कुटुंबीय
यश साने
वसंत बोराटे
विनया तापकीर
संगीता ताम्हणे
घनश्याम खेडेकर