Deenanath Hospital Pune: दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अन् डॉ. घैसासांवर कारवाई होणार, सरकारी पातळीवर हालचालींना वेग
Deenanath Mangeshkar hospital: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गरोदर महिलेवर डिपॉझिट न भरल्यामुळे उपचार झाले नव्हते. यामुळे या महिलेचा मृत्यू झाला.

Pune News: डिपॉझिट न भरल्यामुळे उपचारांअभावी जीव गमावावा लागलेल्या पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात आता सरकारने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारकडून डॉ. सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर (Deenanath Mangeshkar Hospital) प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार असल्याचे समजते. सरकारी पातळीवर यासंदर्भातील कारवाईला वेग आल्याचे समजते.
तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसासांची चौकशी होणार
पुणे पोलीस डॉ. घैसास यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज पुणे पोलीस डॉ. घैसास (Sushrut Ghaisas) यांना नोटीस पाठवणार आहेत. सगळी घटना आता पुणे पोलीस घैसास यांच्याकडून जाणून घेतील. पोलिसांकडून डॉ. घैसास यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल. तुर्तास डॉ. घैसास यांना अटक होण्याची शक्यता नाही.
पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 106( 1 ) या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलम अंतर्गत घैसास यांना अटक होण्याची शक्यता नाही . मात्र पुणे पोलीस डॉ. घैसास यांना उद्या नोटीस पाठवणार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवणार आहेत. या चौकशीतून काय पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत कोणता अहवाल महत्त्वाचा?
1) वैद्यकीय शिक्षण विभागाची चौकशी
पुणे पोलिस आयुक्तांना गुन्हा दाखल करण्यासाठी अहवाल
2) सार्वजनिक आरोग्य विभाग चौकशी
- इंडियन मेडिकल कौन्सिलच्या व्यावसायिक नियमांचे उल्लंघन झाल्याने मेडिकल कौन्सिलच्या माध्यमातून डॉ. घैसास आणि त्यांच्या कर्मचार्यांवर कारवाई करावी.
- महाराष्ट्र सुश्रुषागृह नोंदणी नियम 2021 नुसार पुणे महापालिकेने कार्यवाही करावी.
- मुंबई पब्लिक ट्रस्ट अॅक्ट 1950 चा भंग झाल्याने विधी व न्याय विभागाने धर्मादाय आयुक्तांमार्फत कारवाई करावी.
3) विधी व न्याय विभाग चौकशी
- दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड.
- यातून प्रत्येकी 5 लाखांच्या एफडी होणार. दोन्ही मुली सज्ञान झाल्यावर व्याजासह त्यांना ही रक्कम द्यावी.
- या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून याचा निर्णय आधीच घेण्यात आला.
धर्मदाय रुग्णालय व्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित
1) आता धर्मदाय रुग्णालयातील रुग्णसेवा ही संपूर्णत: ऑनलाईन ठेवावी लागणार.
2) त्यांचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मदाय कक्षाच्या माध्यमातून होईल.
3) धर्मादाय रुग्णालयात येणार्या कोणत्याही रुग्णाला अॅडव्हान्स मागता येणार नाही.
4) धर्मादाय रुग्णालयाने 10 टक्के निधी हा गरिब रुग्णांसाठी वापरला की नाही, याचे लेखे नियमितपणे सादर करावे लागणार
आणखी वाचा























