Pune Traffic Police: चहापेक्षा किटलीच गरम; पुण्यातील 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त वेळा कारवाई, नियम मोडल्याने दंडाचा आकडा लाखांच्या घरात
Pune Traffic Police: पुण्यातील वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणावर नियम तोडल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन वाहन चालकांनी कारवाईने विक्रम मोडली आहे.
पुणे: पुणे तिथे काय ऊणे ही म्हण आपण कायमचं एकतो. अशात पुण्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणावर नियम तोडल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन वाहन चालकांनी कारवाईने विक्रम मोडली आहे. दोन दुचाकी वाहनांवर त्यांच्या दुचाकीच्या किमतीपेक्षही जास्त वाहतूक दंड झाला आहे. तर एका वाहनावर 154 वेळा वाहतूक नियम मोडल्याचा तर दुसऱ्या एका वाहनावर 130 वेळा वाहतूक नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी (Pune Traffic Police) सर्वाधिक दंड झालेल्या काही वाहनांची माहिती घेतली असता त्यात 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त तर तब्बल 988 वाहनांवर 50 पेक्षा जास्त वेळा वाहतूक नियमन मोडल्याबाबत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील (Pune Traffic Police) दोन दुचाकीवर वाहतूक दंड मोडल्याबाबत कारवाई करण्यात आली आहे. एका वाहन चालकाने 154 वेळा नियम मोडले असून, त्याच्यावर 1 लाख 21 हजार रुपये इतका दंड झाला आहे. तर दुसऱ्या वाहनावर 130 वेळा कारवाई झाली आहे. तसेच 21 वाहनांवर 100 पेक्षा जास्त व 50 पेक्षा जास्त वेळा 988 वाहनांवर केलेल्या कारवाईत पोलिसांनी तब्बल 3 कोटी 18 लाखांचा दंड केला आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी (Pune Traffic Police) विविध पातळीवर काम करण्यास सुरुवात केली आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेची कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. 21 पुणेकरांनी तब्बल 100 वेळा वाहतुकीचे नियम मोडले आहेत. पुण्यातील 988 वाहनांकडून 50 पेक्षा अधिक वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. पुणे शहर पोलिसांनी नियम मोडणाऱ्या गाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत 44 गाड्या जप्त केल्या आहेत. प्रत्येक वाहतूक पोलीस विभागाला संबधित गाड्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
त्याचबरोबर वाहतूक नियमनाचे 100 व 50 पेक्षा जास्त वेळा नियम मोडणाऱ्या गाड्यामध्ये खासगी वाहतूक करणारे आणि दंड न भरणाऱ्या वाहन चालकांचे परमीट रद्द केले जाणार आहे. याचबरोबर वैयक्तीक मालक असणारे वाहन चालकांनी दंड न भरल्यास त्यांचा वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. शहरात परिसरात ट्रिपल सीट जाणारे, फोनवर बोलत वाहने चालवणारे व विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावर यापुढेही काळात कारवाई मोठी केली जाणार आहे. अश्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी (Pune Traffic Police) होत असल्याने ही कारवाई वाढवली जाणार आहे.