एक्स्प्लोर

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह हद्दीलगतच्या गावांमधील शाळा व महाविद्यालये बंद, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आदेश

परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बाक रिकामा ठेवावा, एका बाकावर एकच विद्यार्थी असेल अशी व्यवस्था करावी, जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत.

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम लक्षात घेता सदर विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णांकडून दुसऱ्या व्यक्तीस किंवा इसमास तसेच त्यांच्या संपर्कात आल्याने इतर व्यक्तीस होण्याची शक्यता विचारात घेवून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अन्वये पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी, देहूरोड व पुणे कटक मंडळ तसेच शहर हद्दीलगतच्या गावांमधील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्था पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले.

आदेशापर्यंतच्या कालावधीत दहावी आणि बारावीसह इतर सर्व प्रकारच्या परीक्षा नियोजनाप्रमाणे सुरू राहतील. परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करताना दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बाक रिकामा ठेवावा, एका बाकावर एकच विद्यार्थी असेल अशी व्यवस्था करावी, जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या परीक्षेची व्यवस्था स्वतंत्र कक्षामध्ये करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.

WEB EXCLUSIVE | गावाकडच्या मंडळींना कोरोनाची माहिती आहे? गावकरी कसे रोखतायत कोरोनाला?

तसेच जे विद्यार्थी मागील एका महिन्यांमध्ये परदेशातून आलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना कमीत कमी पंधरा दिवस स्वतःच्या घरामध्ये ते जिथे राहत असतील तेथे विलगीकरण/अलगीकरण करणे आवश्यक आवश्यक आहे. तसेच असे विद्यार्थी व संशोधन सहायक जर वसतीगृहात राहत असतील तर त्यांचे विलगीकरण करण्यासाठी आपल्या विद्यापिठात व विद्यापिठाच्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयात व शैक्षणिक संस्थामध्ये वेगळी इमारत किंवा जागा सुनिश्चित करावी जेणे करुन कोरोना विषाणूची लागण इतर विद्यार्थांना होणार नाही, याची जबाबदारी सक्षम अधिकाऱ्यास देण्यात यावी. विलगीकरण कक्ष स्थापन करतांना संबंधित महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेवून त्यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली सदरची कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या आहेत.

आदेशाचे उल्लघंन करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर भारतीय दंड संहिता कलम 188 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी आदेशात म्हटले आहे.

संबंधित बातम्या :

Coronavirus | बुलडाण्यात आलेल्या 12 पैकी 3 विदेशी पाहुण्यांवर उपचार सुरु, 9 जण देखरेखीखाली

#CoronaVirus भारतात चित्रपट, जाहिराती, सीरिअल्सचं शूटिंग बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 9 PM 07 October 2024Top 100 Headlines : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 09 PM : 07 October 2024 ABP MajhaRaj Thackeray VS Narhari Zirwal : राज ठाकरेंना नरहरी झिरवाळांचं प्रत्युत्तर #abpमाझाSanjay Shirsat on Uddhav Thackeray : पहिली अडीच वर्षे सेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपची तयारी होती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Bopdev Ghat Incident : आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
आधी 10 लाखांचं बक्षीस, आता 'सिंबा'ची मदत; पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणी पोलीस फास्ट अ‍ॅक्शन मोडवर
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑक्टोबर 2024 | सोमवार
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जेष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांना जाहीर
Jalna News : जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
जालन्यात काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा, दोन गटात जोरदार घोषणाबाजी
Embed widget