(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#CoronaVirus भारतात चित्रपट, जाहिराती, सीरिअल्सचं शूटिंग बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
कोरोनाचं जाळं जगभर पसरत आहे आणि हॉलीवूड कलाकारांवरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेमा, टीव्ही शोचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 19 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व सिनेमा, टीव्ही शो, जाहिरातींचं शूटिंग, वेब शोजचं शूटिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज, इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोशिएशनच्या बैठकीत एकत्रितपणे हा निर्णय घेण्यात आला आहे.
#CoronaEffect कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिनेमा, टीव्ही शो, जाहिराती आणि वेब सीरिजचं शूटिंग बंद
या फेडरेशनमध्ये तब्बल 30 ते 32 संस्थांचा समावेश आहे आणि यातील चार मुख्य संस्थांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचं वाढतं जाळं पाहता त्याचा फिल्म इंडस्ट्री आणि मीडियावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निर्णयानुसार 19 मार्चपासून 31 मार्चपर्यंत कुणीही शूटिंग करणार नाही आणि कुठल्याही शूटिंगमध्ये सामील होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन बोर्डाकडून करण्यात आलं आहे.
31 मार्चपर्यंत जर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसला तर कदाचित शूटिंग पुन्हा सुरू केलं जाऊ शकतं, मात्र तसं न झाल्यास शूटिंगवर बंदी कायम असेल अशी माहिती देण्यात आली आहे. बॉलिवूडप्रमाणेच मराठी फिल्म इंडस्ट्रीलादेखील या निर्णयाचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, नाटक, वेब सीरिज यावर परिणाम दिसून येईल.
हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम हॅंक्स, त्यांची पत्नी अभिनेत्री रिटा विल्सन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. फक्त सामान्य जनताच नाही तर सेलिब्रिटीजवरदेखील कोरोनाचा विळखा आहे. त्यामुळे भारतात ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ही दक्षता घेण्यात येत आहे. चित्रपटांचं शूटिंग बंद होईल मात्र सीरिअल्सचं शूटिंग बंद कसं करता येईल हा मोठा प्रश्न दिग्दर्शकांसमोर उभा राहिला. डेली सोप्सचं रोजच शूटिंग केलं जातं आणि ते थांबवल्यास त्यावेळी टीव्हीवर दाखवायचं काय हासुद्धा प्रश्न निर्माण झाला.
Coronavirus | 'गो कोरोना'वर उत्कर्ष शिंदे यांचं नवं गाणं
सीरिअल्सचं शूटिंग तातडीने बंद न करता आणखी तीन-चार दिवसांचा वेळ शूटिंगसाठी देण्यात आला आहे. या वेळात जितकं शूटिंग करता येईल तितकं करण्याची मुभा कलाकारांना असेल. शूटिंग थांबल्यानंतर त्याजागी काय दाखवायचं हा निर्णय पूर्णपणे ब्रॉडकास्टरचा असेल. त्यामुळे आता सर्वच बंद होत असल्याने मनोरंजनाचा मार्गदेखील दुरावणार या विचाराने प्रेक्षकही नाराज होणार आहेत. कोरोनाच्या भीतीने जास्तीत जास्त नागरिक घरी राहणं पसंत करत आहेत. घरी बसून मनोरंजन म्हणून आता सीरिअल्सचा पर्याय बंद होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar #Corona आदेशाचे पालन न झाल्यास कारवाई, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा चित्रपटगृह मालकांना इशारा
संबंधित बातम्याCoronavirus | बुलडाण्यात आलेल्या 12 पैकी 3 विदेशी पाहुण्यांवर उपचार सुरु, 9 जण देखरेखीखाली
इराणमधल्या अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले
Coronavirus | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचवर; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता