एक्स्प्लोर

Pune news : नेपाळी विद्यार्थ्याचा चौथ्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; पोलिस आणि अग्निशमन जवानांनी वाचवला जीव

तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांची हाणून पाडला आहे.तरुण चौथ्या मजल्यावर गेला आणि त्याने थेट उडी मारली मात्र त्याचवेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला वरच्या वर झेललं. त्यामुळे तरुणाचा जीव वाचला.

पुणे : आत्महत्येच्या प्रयत्नाचा अंगावर (Pune Fire) काटा आणणारा थरार पुण्यात अनुभवयाला मिळाला. आंबेगाव इथल्या सिंहगड कॉलेज परिसराती ही घटना आहे. पोलिस आणि अग्निशमन जवानांनी आत्महत्येसाठी चौथ्या मजल्यावरून उडी मारलेल्या युवकाला अक्षरशः वरच्या वर अलगद झेलून मृत्यूलाही परत पाठवण्याचा पराक्रम केला. जीवावर बेतणार हे माहित असूनही पोलीस आणि अग्नीशमन जवानांनी केलेल्या धाडसाचं कौतुक सर्वत्र होत आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचं नाव विवेक पारखी (वय 21 वर्षे, रा.नेपाळ) असं आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यानं अंबर ग्रीन सोसायटी, सिंहगड काँलेज कँपस येथील एका चार मजली इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिसरातील लोकांना कळताच त्यांनी पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना कळवलं. बचाव पथक अतिशय तत्परतेनं घटनास्थळी दाखल झालं. तोपर्यंत  लोक खाली गोळा होऊन हल्लकल्लोळ करू लागले. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. 

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विवेक पारखीला वरच्यावर झेलण्यासाठी बचाव पथक जाळे टाकत असतानाच विवेकने थेट टेरेसवरून खाली उडी घेतली. अगदी अखेरच्या क्षणी प्रसंगावधान दाखवत बचाव पथकानं त्याला वरच्या वर झेललं आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी

पुण्यातील अग्निशमन दलाच्या जवानांनी कायमच उत्तम कामगिरी बजावली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले यांनी देखील कुटुंबीयांना जत्रेला घेऊन जात असताना रस्त्यावर पेट घेत असलेली गाडी पाहिली आणि जीवाची तमा न बाळगता कुटुंबीयांना सोबत घेत गाडीची आग विझवली होती. त्यांनी कुटुंबीय सोबत असताना आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टीवर असताना केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झालं होतं. पुण्यातील उंड्री परिसरात रात्री एका चालत्या बीएमडब्ल्यू कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी ऑफ-ड्युटी असलेला अग्निशमन दलाचा जवान मदतीसाठी आला. पेटलेली गाडी पाहून त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकले आहे का याची प्रथम पाहणी केली. मग धर्मावत पेट्रोल पंप येथील अग्निरोधक उपकरण वापरुन बीएमडब्ल्यु-एक्सवन या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरुपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता.

इतर महत्वाची बातमी-

Pune Punit Balan : गावभर होर्डिंग्स अन् 3 कोटी 20 लाखांचा दंड; कोण आहेत पुण्यातील गणेश मंडळांना मालामाल करणारे पुनित बालन?

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
पुणे पदवीधरमधील आमचे दोन्ही उमेदवार उच्चशिक्षित; चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं, गोकुळचंही सांगितलं
Devendra Fadnavis on Spy Camera in Pune MLC Election: पुण्यात शिक्षक-पदवीधरच्या मतदानात भाजपकडून स्पायकॅमच्या वापराचा आरोप, शर्टच्या खिशाला पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे, सुप्रिया सुळेंच्या आरोपाला फडणवीसांचं प्रत्युत्तर
शर्टच्या खिशाला 'स्पाय' पेन, कमळाचं बटण दाबून बाहेर आल्यावर पैसे; सुप्रिया सुळेंच्या आरोपवर फडणवीस काय म्हणाले?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget