(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Weather : पुणे तापलं! चंद्रपूरनंतर पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; शिरुरचा पारा 40.2 अंश सेल्सिअस
राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हॉट सीटी अशी ओखळ असणारं शहर म्हणजेच, चंद्रपूर हे पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरात 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.
Pune Weather Updates : पुणे (Pune News) शहराचा पारा मागील काही दिवसांपासून वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर एप्रिल महिन्यात तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. पुण्यात दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. दुपारी पुणेकरांना घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. चांगल्याच उन्हाच्या झळा जाणवत आहे. सरासरी कमाल तापमान 40.2 अंश सेल्सिअस नोंदवलं जात आहे. राज्यातील सर्वाधिक तापामानात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर हॉट सीटी अशी ओखळ असणारं शहर म्हणजेच चंद्रपूर (Chandrapur) हे पहिल्या क्रमांकावर आहे. चंद्रपूरात 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे
सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याच्या उन्हाचा सामना सध्या पुणेकर करत आहे. दिवसभरात तापमानात तब्बल 20 ते 25 अंशांचा फरक पडत असल्यामुळे अनेक पुणेकर हैराण झालं आहेत. मागील काही वर्षात पुण्यातील तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कायम थंड वातावरण अशी ओळख असलेल्या पुण्याची आता हॉट सीटी म्हणून ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पावसाची शक्यता सांगितली होती. मात्र उन्हाचा पारा वाढत आहे. बुधवारी (5 एप्रिल) रोजी पुन्हा पारा वर चढला आहे. शिरूर 40.2 सेल्सिअस, कोरेगाव पार्क 39.5 अंश सेल्सिअस, लवळे 39 अंश सेल्सिअस, वडगाव शेरी 39 अंश सेल्सिअस, चिंचवड 38 अंश सेल्सिअस, मगरपट्टा 37.9 अंश सेल्सिअस, खेड 37.7 अंश सेल्सिअस, इंदापूर 37.3 अंश सेल्सिअस, दौंड 37.2 अंश सेल्सिअस, बालेवाडी 37 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 36.8 अंश सेल्सिअस, तळेगाव 36.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे.
चंद्रपूरनंतर शिरूरमध्ये सर्वाधिक तापमान
राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून चंद्रपूर शहराची ओळख आहे. दरवर्षी चंद्रपूर, अकोला आणि वर्धा या तीन शहरात सर्वाधिक तापामानाची नोंद होत असते. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक भागात 45 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद होत असते. दरवर्षी उष्माघाताचे बळीदेखील जात असतात. मात्र याच उष्ण शहराच्या रांगेत आता पुण्याचाही समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. येत्या काळात उष्णतेही लाट येणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद
पुण्यात फेब्रुवारीमध्ये 147 वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. सकाळी थंडी आणि दुपारी कडाक्याचं ऊन असं वातावरण होतं. त्यामुळे पुणेकरांनी चांगलीच दमछाक झाली होती. येत्या काळात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत शहराचे तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असं आयएमडी अधिकाऱ्यांचे म्हणणं होतं.