Pune koyta Gang : कोयता गँगची दहशत संपेना; भर दिवसा कोयतचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख
भर दिवसा कोयतचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख रुपये लुटले आहेत. नाना पेठेत दिवसाढवळ्या तरुणांनी व्यापाराला लुटले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Pune koyta Gang : मागील काही महिन्यांपासून (Pune Crime News) पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. दर दोन दिवसाला वेगळी प्रकरण पुढे येत आहे. कोयता दाखवून दहशत माजवून नागरिकांना लुटण्याचे प्रकार सुरुच आहेत. तसाच प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. भर दिवसा कोयत्याचा धाक दाखवून लुटले तब्बल 47 लाख रुपये लुटले आहे. नाना पेठेत दिवसाढवळ्या तरुणांनी व्यापाराला लुटले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
नाना पेठेतील आझाद आळी येथे हा प्रकार घडला आहे. आझाद आळीमधून टू व्हीलरवरून दोघे आले आणि त्यांनी व्यापाऱ्याला कोयता दाखवून पैश्याने भरलेली पिशवी पळवली. ही सगळी माहिती मिळताच समर्थ पोलीस स्टेशनच्या अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तंबाखूचा व्यापारी नेहमीप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी दुचाकीवर जात असताना नाना पेठ येथील आजाद आळीमधून बाहेर येतात दोन तरुणांनी दुचाकीवरून येऊन या व्यापाऱ्याला अडवले. गाडीवरून उतरून त्या दोन तरुणांनी व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवला आणि त्यांच्याकडील पैशाने भरलेली पिशवी ही घेऊन ते दोघेही पसार झाले. व्यापारी असल्याच्या कारणामुळे दररोज बँकेत पैसे जमा करण्यासाठी मोठी रक्कम ते घेऊन जात असतात. या पिशवीत तब्बल 47 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुण्यात कोयता गॅंगची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात आतापर्यंत या गॅंगने पुण्यातील अनेक परिसरात धुमाकूळ घातला आहे. अनेकांवर जीव घेणे हल्लेदेखील केले आहेत. पोलिसांकडून या कोयता गँंगच्या आरोपींची धिंडदेखील काढली होती तरीही हे आरोपींना पोलिसांचा धाक नसल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच या कोयता गँगच्या म्होरक्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. सचिन माने असं या म्होरक्याचं नाव होतं. तो मैत्रिणीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. ज्या दिवशी माने हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी घोरपडी भागात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता.
पुण्यातली भाईगिरी काही नवीन नाही पण कोयता, कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचा पॅटर्न सध्या अनेक महिन्यांपासून शहरातील मध्यवर्ती भागात पाहायला मिळत आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा टोळक्यांना ठोकून काढणार असे सांगितले आहे. त्यामुळे आता तरी अशा गुन्हेगारांना खाकी पोलिसांचा वचक बसतो का हे? पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.