युझवेंद्र चहलसोबत सुंदर आरजे माहवश दिसली, इकडे धनश्री वर्माच्या सूचक इन्स्टा स्टोरीनेही वादळ उठवलं; म्हणाली, नेहमी स्त्रियाच...
Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : युझवेंद्र चहल सामना चालू असताना एका सुंदर तरुणीसोबत दिसल्यानंतर आता धनश्री वर्माने सूचक स्टोरी ठेवली आहे.

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भारत आणि न्युझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना झाला. या सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला. युझवेंद्र चहल यावेळी भारतीय संघाचा भाग नव्हता. मात्र तो स्टेडियममधून सामना पाहताना कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे त्याच्याबाजूलाच एक सुंदर तरूण बसलेली असल्याचे दिसले. एकीकडे चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली असताना युझवेंद्र चहलच्या बाजूला ही सुंदर तरुणी दिसल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. असे असतानाच आता धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर सूचक स्टोरी ठेवली आहे. तिच्या या स्टोरीनंतर आता नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे.
सामन्यात नेमकं काय झालं?
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात युझवेंद्र चहल स्टेडियममध्ये बसला होता. संघाचा भाग नसला तरी तो सामना पाहण्यासाठी दुबईत गेला होता. सामना चालू असताना त्याच्या बाजूला एक सुंदर तरुणी बसल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. विशेष म्हणजे ते दोघेही एकमेकांशी दिलखुलासपणे गप्पा मारत होते. त्यांच्यात हास्यविनोदही चालू होते. हो देघेही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. युझवेंद्र चहल या तरुणीच्या प्रेमात असून ते एकमेकांना डेट करत असल्याचाही काहींनी दावा केला. काही लोकांनी या दोघांचे जुने फोटो शेअर करून हे दोघेही पहिल्यापासूनच एकमेकांना ओळखतात, असल्याचंही सांगितलं.

व्हायरल झालेली ती तरुणी कोण?
एकीकडे युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्याही चर्चा चालू आहेत. बऱ्याच महिन्यांपासून ते दोघेही एकत्र दिसलेले नाहीत. त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनंतर या दोघांनीही तथ्य माहिती नसताना आम्हाला बदमान करू नका, अशा आशयाच्या सोशल मीडियावर स्वतंत्र पोस्ट केल्या होत्या. असे असताना सामन्यात युझवेंद्र चहलसोबत बसलेली ती व्हायरल मिस्ट्री गर्ल कोण आहे? असे विचारले जात होते. तिचे नाव आता समोर आले आहे. युझवेंद्र चहलसोबत बसलेल्या तरुणीचे नाव माहवश असे आहे. ती एक आरजे आहे. विशेष म्हणजे ती अभिनेत्री, निर्मातीदेखील आहे.
धनश्री वर्माच्या इन्स्टाग्राम स्टोरीत नेमकं काय आहे?
दरम्यान, युझवेंद्र चहल आणि आरजे माहवश एकत्र दिसल्यानंतर आता धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर सूचक स्टोरी ठेवली आहे. तिच्या या स्टोरीचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहे. तिने स्टोरीमध्ये "स्त्रीयांना दोष देणे ही कायमच फॅशन राहिलेली आहे," असं तिने म्हटलंय. चहल आणि माहवश यांचे एकत्र असतानाचे फोटो समोर आलेले असतानाच धनश्रीने ही स्टोरी पोस्ट केली आहे. त्यामुळे चहल आणि धनश्री यांच्या नात्यात नेमकी काय अडचण आहे? त्यांचे नात्याची नेमकी स्थिती काय आहे? असे त्यांचे चाहते विचारत आहेत.
हेही वाचा :
युझवेंद्र चहलसोबत बसली अन् क्षणात व्हायरल, भारतासाठी ठरली 'गुडलक गर्ल', 'ती' सुंदर तरुणी नेमकी कोण?























