Ravindra Dhangekar : धंगेकर म्हणाले, हे मस्त जुळवाजुळव करतात, तर शिंदे म्हणाले, आता सगळ्यांना समजेल 'हू इज धंगेकर'; रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश
Ravindra Dhangekar Joins Shiv Sena : ज्या ठिकाणी अन्याय आहे तिथे धंगेकर आहेच, कार्यकर्त्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही असं माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी म्हटलं.

मुंबई : काँग्रेसला रामराम करत माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी आज शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, सर्वसामान्यांची कामं मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन आपण हा निर्णय घेतल्याचं धंगेकरांनी म्हटलं. शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणारे धंगेकर पुन्हा स्वगृही परतले आहेत. शिवसेनेत काम करताना कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असं धंगेकर म्हणाले. तर सगळ्यांना समजेल की हू इज धंगेकर, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
अन्याय असेल तिथे धंगेकर आहेच
यावेळी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, "मी शिवसेनेचा 10 वर्ष नगरसेवक होतो. त्यामुळे हे कुटुंब माझासाठी नवीन नाही. अनेक प्रभावी कामं शिंदेसाहेबांनी केली आहेत. सामंत साहेबांनी मला पुन्हा इथं आणलं. सामंतसाहेब मस्त जुळवाजुळव करतात. मला तर वाटतं घराघरात भांडणं झाली की तुम्हालाच न्ह्यायला हवं. या पुढे शिंदेसाहेब जे आदेश देतील ते आम्ही पूर्ण करू. शिवसेनेचं नाव उंचीवर नेण्याचं काम करू. शिंदेसाहेब कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाहीत. कांदिवलीत आपण पाहिलतं, आपल्या पक्षातील एका व्यक्तीने सामान्य व्यक्तीचं घर ताब्यात घेतलं होतं. शिंदे साहेबांना हे समजताच त्या सामान्य व्यक्तीला त्याचं घर परत दिलं तर त्या पदाधिकाऱ्याला पक्षातून काढून टाकलं."
मी पुण्यात काँग्रेसचा नगरसेवक, आमदार होतो. लोकसभाही लढवली. पण शिंदे साहेबांच्या कामाने प्रभावित झालो. माझी काँग्रेसमध्ये नाराजी नव्हती. माझावर तिथेही विश्वास दाखवला. त्यांचेही आभार. यापुढे जिथे अन्याय दिसेल तिथे धंगेकर आहेच असं धंगेकर म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज रवींद्र धंगेकर पून्हा पक्षात आलेत. निवडणुकीत त्या्ंच्याविरोधात सर्व फौज लागली होती तरी ते ऐकले नाहीत. ते पुण्यातील एका प्रभागात 25 वर्षे नगरसेवक होते. त्यातील 10 वर्षे शिवसेनेतून होते. सर्वसामान्यांना जे काही हवं ते दुचाकीवरून द्यायचे. पुण्यातील पोटनिवडणूक गाजली. एवढं सर्व करूनही धंगेकर यांनी बाजी मारून लोकसेवक काय असतो हे दाखवलं. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. तुम्ही आता शिवसेनेत आला, लोकांना कळेल, हू इज धंगेकर."
Ravindra Dhangekar Political Journey : रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवास
- रवींद्र धंगेकर मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते. 1997 साली धंगेकर पहिल्यांदा पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
- धंगेकर कसब्यातून चार वेळा नगरसेवक बनले.
- 2006 साली धंगेकरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
- मनसेच्या तिकिटावर धंगेकरांनी कसबा मतदारसंघातून 2009 ची विधानसभा लढली. त्यात अवघ्या 7000 मतांनी ते पराभूत झाले.
- 2014 सालीही मोदी लाटेत धंगेकरांचा पराभव झाला.
- 2017 साली धंगेकरांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आणि काँग्रेसची वाट धरली.
- 2023 मध्ये कसबा पोटनिवडणूक जिंकून धंगेकरांनी भाजपला धक्का दिला होता.
- मात्र 2024 च्या विधानसभेत धंगेकरांचा भाजपच्या हेमंत रासनेंकडून पराभव झाला.
- 10 मार्चला काँग्रेसला सोडचिठ्ठी देत धंगेकर पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
ही बातमी वाचा:























