Pune NCP News: 'काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत भरपावसात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं आंदोलन
'अरे काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत या आंदोलन करणाऱ्या महिलांनी मोदी सरकारला टार्गेट केल आहे.
Pune NCP News: वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी आता अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर काल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ बसली आहे.कालपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलx आहे. याच महागाई विरोधात पुण्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आज भर पावसात मोदी सरकार विरोधात आंदोलन केला आहे. या आंदोलनात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा गाजलेला डायलॉग वापरत 'अरे काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजप सरकार' म्हणत या आंदोलन करणाऱ्या महिलांनी मोदी सरकारला टार्गेट केल आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत. गॅस दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
आठ वर्षांपुर्वी गॅसचा दर हा सहाशे रुपये होता आणि आता गॅस 1053 रुपयांना मिळतो आहे. भाजप सरकार जेव्हा विरोधी बाकावर होतं तेव्हा गॅसच्या किंमती वाढल्या तर सातत्याने आंदोलनं आणि मोर्चा करायचे. त्यामु आम्हीसुद्धा तीच मागणी करत आहोत. अर्थमंत्री निर्मला सितारामण आणि दरवेळी गॅससाठी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्या स्मृती ईराणी या संसार करतात त्यांना देखील महिलेच्या कामाकाजाचा अनुभव आहे. मोदींना यात बोलण्यात काही एक अर्थ नाही कारण मोदींना घरच नाही त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या भावना कळू शकणार नाही, असं मत शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या वैशाली नगोडे यांनी व्यक्त केलं आहे.
गेली 10 दिवस राज्यात काय सत्तानाट्य सुरु आहे हे सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे. सातत्याने आमदारांचे रेट काय होते हे आम्हाला कळत होतं. 50 कोटी हा आकडा आम्हाला ऐकू आला. त्याचीच भरपाई नागरिकांकडून केली जात आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. घरकामातील वस्तुंची किंमत वाढली की महिलेचं महिन्याभराचं कामकाज बिघडते. हिशोब बिघडतो. त्यामुळे लवकरात लवकर गॅसचे दर कमी करा, अशी मागणी कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी केली आहे.