एक्स्प्लोर

Pune Accident : नवले पुलाजवळ अपघातांची मालिका कायम, काल रात्रभरात आणखी दोन अपघात

Pune Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ काल रात्रभरात आणखी दोन अपघात झाले. या दोन अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला.

Pune Accident : पुण्यात (Pune) अपघातांची मालिका कायम आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ (Navale Bridge Accident) काल रात्रभरात आणखी दोन अपघात झाले. या दोन अपघातात सहा जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. नवले ब्रिजवरील भीषण अपघातानंतर स्वामी नारायण मंदिराजवळ दुसरा भीषण अपघात झाला. या अपघातात टेम्पोने सात वाहनांना उडवलं. तर कात्रज रस्त्यावर तिसरा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. नवले पुलाजवळ रात्रभरात एकूण तीन अपघात झाले.

टेम्पोने सात वाहनांना उडवलं
स्वामी नारायण मंदिराजवळ आणखी एक अपघात झाला. टेम्पोने सात वाहनांना उडवलं. अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं. एका गाडीचा चक्काचूर झाला. या कारमधील सहा जण जखमी झाले. तर दैव बलवत्तर म्हणून चालक या अपघातात सुदैवाने बचावला. तर तिसऱ्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

नवले ब्रिजवर भीषण कंटनेरची वाहनांना धडक
नवले पुलावर काल (20 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास नर्हे नजीकच्या परिसरात भीषण अपघात झाला. कंटेनरने धडक दिल्यामुळे 24 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाने दिली. आंध्र प्रदेशाचा हा कंटेनर साताऱ्याहून मुंबईकडे जात होता. या ठिकाणी तीव्र उतार आहे. त्यामुळे रात्री वाहतूक संथ गतीने सुरु होती. वेगाने आलेल्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले. त्याने एका पाठोपाठ पुढे असलेल्या गाड्यांना धडक देण्यास सुरुवात केलीयअपघातामुळे रस्त्यावर तेल पसरलं. परिणामी रस्ता घसरडा झाला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहनांची संख्या वाढली. दरम्यान या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक जण जखमी झाल्याचं समोर आलं आहे. अपघातामुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला होता. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सुमारे दोन ते तीन किमी लांबीच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

नवले पूल अपघाताचं केंद्र
पुण्यातील नवले पुल हा अपघातांचं केंद्र बनला असून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहेत. कारण आहे या ठिकाणी चुकलेली रस्त्याची रचना. तीव्र उतार आणि  वळणे एकत्र झाल्याने पुण्यातील नवले पुलाचा भाग अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे. सतत होणाऱ्या या अपघातांकडे महामार्ग प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने करण्यात आली आहेत. होमहवन, प्रेतयात्रा अशी प्रतिकात्मक आंदोलने देखील करण्यात आली आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाल्याचे दिसत नसून अपघातांचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे रस्त्याची रचना बदलावी अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

संबंधित बातमी

Pune Accident: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, अनेक वाहनं एकमेकांवर आदळली, मुख्यमंत्र्यांकडून दखल

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SRPF Exam Cancelled : राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द, 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई
राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द, 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
NEET Exam Paper Leak: आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
आधी 11 तास चौकशी; नंतर सीबीआयकडून अटक, मोटेगावकरांच्या आरसीसी कोचिंग क्लाससमोर शुकशुकाट, ट्युशनला सुट्ट्या असल्याचं सांगून विद्यार्थांना परत पाठवलं
Pune Crime News: पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं
पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये धक्कादायक घटना, पार्टी संपल्यावर घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये नेलं अन् महिलेसोबत नको ते केलं

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget