Pune Navale Bridge Accident : नवले पुलावर विचित्र अपघात! सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना सिमेंटच्या ट्रकची धडक, एकाचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. कात्रज चौकाकडून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली आहे.
पुणे : पुण्यातील नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला आहे. कात्रज चौकाकडून (Pune Navale Bridge Accident) येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने नवले पुलाजवळ चौकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांना जोराची धडक दिली आहे. यात महाराष्ट्र शासनाच्या गाडीचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. सिग्नलला उभ्या असणाऱ्या पाच वाहनांनाही जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
संदेश बानदा खेडेकर (वय: 34 वर्षे, रा. टिळेकर नगर, इस्कॉन मंदिराजवळ, कात्रज - कोंढवा रस्ता, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अपघात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कात्रजकडून नवले कडे येणाऱ्या रस्त्यावर नवले पुल चौकामध्ये ट्रक क्रमांक के. ए. 56- 3165 ट्रकने सिग्नलला उभे असलेल्या Ertiga MH 12-JU-3565, Ertiga MH 02-DS-6496, Swift-MH 12-QT-6762, Nexon MH 12-UN-3004, एक टू व्हीलर TVS रायडर -MH 12-UB-0787 - यांना पाठी मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संदेश बानदा खेडेकर(वय-34) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही आहेत. ट्रक चालक पंकज राजाराम नटकरे( वय -21, रा. बसवकल्याण, बिदर,कर्नाटक) यास सिंहगड रोड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे . घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभागाचे कर्मचारी अधिकारी हजर असल्याने तात्काळ मदत मिळाली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहेत, अशी माहिती सिंहगड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी सांगितले.
नवले पूल बदनाम
पुण्यातील नवले पूल हा अपघातांसाठी बदनाम झाला आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे.
नवले पुलाने आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा जीव घेतला
सन 2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
इतर महत्वाची बातमी-