आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला.
Pune Nashik Highway Accident : पुणे नाशिक महामार्गावर नारायणगावमध्ये भरधाव आयशर ट्रकने मागून धडक दिल्याने वडाप टॅक्सी तब्बल 20 फूट हवेत उडून समोर महामार्गाच्या बाजूला असलेल्या बंद एसटीवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर आयशर चालक फरार झाला. धडक इतकी भीषण होती वडाप टॅक्सीमधील सीट आणि साहित्य तसेच भाजीपाला सुद्धा बाहेर फेकला गेला.
पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघे जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार शरद सोनवणे यांनीही घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, नारायणगाव येथे हा दुर्दैवी अपघात झाला आहे. हा अत्यंत गंभीर अपघात आहे. अपघात आयशर चालकामुळे झाल्याचे आमदार शरद सोनवणे यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
प्रत्यक्षदर्शी नंदू अडसरे यांनी एबीपी माझाशी बोलताना अपघात किती भयावह होता हे सांगितलं. त्यांनी सांगितले की, आयशर चालकाने इतका वेग होता की त्याच्या धडकेत टॅक्सी बंद पडलेल्या एसटीवर जाऊन आदळली. विचित्र आणि मनाला वेदना होता. प्रवाशी अडकल्याने जेसीबी आणि ट्रॅक्टर बोलवून बाहेर काढण्यात आले. गाडीचे पार्ट बाजूला करून प्रवासी बाहेर काढण्यात आले. गाडीला धडक दिल्यानंतर आयशरवाला टेम्पो घेऊन पळून गेल्याचेही त्यांनी सांगितले.
नेमका कसा घडला अपघात?
नाशिकहून पुण्याच्या दिशेने आयशर टेम्पो आणि मॅक्स ऑटो निघाली होती. मॅक्स ऑटो ही वडाप म्हणजे प्रवाशांना घेऊन प्रवास करत होती. आज (17 जानेवारी) सकाळी आळे फाटा येथून राजगुरूनगर पर्यंतचे एकूण 15 प्रवासी मॅक्स ऑटोमध्ये होते. त्यामुळं एकमेकांना न ओळखणारे प्रवासी सोबत प्रवास करत होते. आळे फाटा येथून बारा किलोमीटर अंतरावर आयशर टेम्पोने मॅक्स ऑटोला जोराची धडक दिली. यात चार पुरुष, चार महिला आणि एका मुलाचा अशा नऊ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मॅक्स ऑटोचे चालक विनोद रोकडे यांचाही मृत्यू झाला.
मयतांची नावे
1) देबुबाई दामू टाकळकर, वय 65 वर्ष रा. वैशखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2) विनोद केरूभाऊ रोकडे, 50 वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
3) युवराज महादेव वाव्हळ, वय 23 वर्ष रा 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
4) चंद्रकांत कारभारी गुंजाळ, वय 57 वर्ष राहणार कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
5) गीता बाबुराव गवारे, वय 45 वर्षे 14 नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे
6) भाऊ रभाजी बडे, वय 65 वर्ष रा नगदवाडी कांदळीतालुका जुन्नर जिल्हा पुणे
7) नजमा अहमद हनीफ शेख, वय- 35 वर्ष रा.गडही मैदान खेड राजगुरुनगर
8) वशिफा वशिम इनामदार, वय 5 वर्ष
9) मनीषा नानासाहेब पाचरणे, वय 56 वर्षे रा.14 नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
इतर महत्वाच्या बातम्या