एक्स्प्लोर
पुणे महापालिकेचं बजेट सादर, गेल्या वर्षापेक्षा 42 कोटींची घट
शिवसृष्टीसाठी 25 कोटींची तरतूद यात करण्या आली आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सायकल ट्रॅक, पार्किंग आणि सायकल लेन उभारणीसाठी सायकल धोरणाच्या नावाखाली 55 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
पुणे : पुणे महानगरपालिकेचं 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचं बजेट आज सादर करण्यात आलं. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी 5 हजार 870 कोटी रुपयांचे बजेट सदर केलं. गेल्या वर्षापेक्षा 42 कोटी रुपयांनी कमी असलेलं हे बजेट आहे.
शिवसृष्टीसाठी 25 कोटींची तरतूद यात करण्यात आली आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, सायकल ट्रॅक, पार्किंग आणि सायकल लेन उभारणीसाठी सायकल धोरणाच्या नावाखाली 55 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बजेटमधील महत्त्वाच्या तरतुदी :
- समान पाणीपुरवठा योजनेसाठी 320 कोटी रुपये
- घनकचरा व्यवस्थापनासाठी 478 कोटी रुपये
- स्मार्ट सिटीसाठी 50 कोटी
- बालगंधर्व रंगमंदिर पाडून पुन्हा नव्याने बांधणार, त्यासाठी 10 कोटींची तरतूद
- पीएमपीएमएल लाभ 11 लाख नागरिकांवरुन 40 लाख नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट, एकूण तरतूद 246 कोटींची आहे
- नदीसुधार प्रकल्पासाठी 990 कोटींची तरतूद
- सिंहगड रस्ता आणि सहकारनगर, पद्मावती, पर्वती ही उपनगरे थेट जोडण्याच्या दृष्टीने तळजाई टेकडीतून सिंहगड रस्त्याला जोडणारा बोगदा तयार करणार, त्यासाठी 2 कोटींची तरतूद
- पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकासासाठी 98 कोटींची तरतूद
- पालिकेच्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थींनींना मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्याच्या योजनेसाठी एक कोटीची तरतूद
- मेट्रोसाठी स्पष्ट तरतूद नाही. मात्र महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या मागणीनुसार महापालिकेच्या वाट्याचा निधी उपलब्ध करुन देणार
मागच्या वर्षीपेक्षा यंदा बजेट कमी असल्याचं स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिलं. “मागच्या वर्षापेक्षा बजेट वाढू द्यायचं नाही, असं आम्ही ठरवलं होतं. उत्पन्न कमी होत असताना नवीन योजना आणायचं नाही, असं ठरवलं होतं. यामध्ये शहराचा सुनियोजित विकास कसा होईल हाच प्रयत्न आहे.”, असे मोहोळ म्हणाले.
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनीही बजेटच वास्तववादी बजेट म्हणून कौतुक केलं. तर दुसरीकडे विरोधकांनी फुगवलेलं आणि फसवणुकीचं बजेट म्हणून टीका केली. तर या बजेटवर शिवसेनेनंही दिशाहीन बजेट म्हणून टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement