एक्स्प्लोर

मोठी बातमी : सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला चार दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात काय झालं?

Pune Kalyani Nagar accident : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Pune Kalyani Nagar accident :  कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांना चार दिवसांपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघेही आता 31 मे पर्यंत पोलीस कोठडी असणार आहे. कल्याणीनगर येथील अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका शिपायलाही अटक करण्यात आलेय. त्यांनी ब्लड सँपलमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी कोर्टानं तावरे आणि हळनोर यांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  

पोर्शे कार अपघात प्रकरणी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं होते. ड्रायव्हरचं अपहरण, मुलाचा गुन्हा स्वतःवर घ्यावा, अन तसं न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोर्टामध्ये सुनावणी झाली. आजोबा सुरेंद्रकुमार आधी अटकेत होते, विशाल अग्रवालला याप्रकरणी आज अटक दाखवण्यात आलेली आहे. कोर्टामध्ये दोन्ही पक्षाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद झाला. सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यामध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आरोपी सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोर्टामध्ये युक्तीवाद काय काय झाला ?

प्रशांत पाटील - वकील ( बचाव पक्ष ) 

तीन वेगवेगळ्या एफआयर या एकाच केसमध्ये झाल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबत छेडछाड झाली आहे की नाही हे त्यांना बघायचं आहे. अग्रवाल यांच्या घरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत, त्यात अजून काय सर्च करण्यासारखं नाही. ड्रायव्हरने त्याच्या  पत्नीसह घरी येत आमचे मोब लिंचींग होइल असं सांगितलं. यासाठी तो घरी आला. नंतर फक्त त्याची बाईक घेण्यासाठी अग्रवाल यांच्या घरी आला होता. 

सरकारी वकील युक्तीवादावेळी काय म्हणाले ? 

अपघाताची घटना वेगळी आहे. आम्हाला याप्रकरणाचा जॉइंट तपास करायचा आहे. मोबाईल तपास सुरू आहे. या सगळ्यांची पोलीस कोठडी गरजेची आहे. कारण उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असल्याचं आम्हाला संशय आहे. त्यासाठी चौकशी करणं आवश्यक आहे

सुनावणीत दोन्ही बाजूंनी मांडलेले मुद्दे

सुरेंद्रकुमार अग्रवाल काय म्हणाले ? 

दुर्दैवी अपघात झाला. सकाळी मला याबाबत समजलं. त्यावेळी मी तात्काळ ड्रायव्हरला घेऊन गेलो. त्याच्यासोबत दोन मिनिटं बोलणं झालं. त्यानंतर  मी त्याला घरच्यांना फोन कर असे सांगितले. आम्ही एक प्रतिष्ठित कुटुंब आहोत. 

सरकारी वकील काय म्हणाले ?

सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवाल या दोघांची सात दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. ड्रायव्हरचा फोन या दोघांनी काढून घेतला आहे, जो अद्याप पोलिसांना दिलेला नाही. तो मोबाईल हस्तगत करण्यासाठी दोघांचाही तपास एकत्र करणं गरजेचं आहे.  या गुन्ह्यात आणखी कोणी मदत केली आहे का? याचा सखोल तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी. 

आणखी वाचा :

Kalyani Nagar accident : मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, डॉ. अजय तावरेचा इशारा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget