एक्स्प्लोर

Kalyani Nagar accident : मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, डॉ. अजय तावरेचा इशारा

Kalyani Nagar accident : मी सर्वांची नावं घेणार, शांत बसणार नाही, डॉ. डॉ अजय तावरे यांची पोलिसांना धक्कादायक माहिती.

Kalyani Nagar accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हळनोर या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केली. पोलिसांनी तावरे अन् श्रीहरी यांची कसून चौकशी सुरु केली आहे. पोलीस चौकशीदरम्यान तावरेनं मोठं वक्तव्य केलेय. कारवाईदरम्यान डॉ.अजय तावरे यांनी पोलिसांना सांगितले की, 'मी शांत बसणार नाही. मी सर्वांची नावे घेईन' असा इशारा दिला आहे.

डॉ अजय तावरे हे ससूनमध्ये फॉरेन्सीक लॅबचे प्रमुख आहेत. त्यांच्या फोनकॉलनंतरच आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचं तपासात समोर आलेय. पोलिस चौकशीदरम्यान अजय तावरे यांनी मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन, असा गर्भित इशाराच दिलाय. तावरेच्या या इशाऱ्यानंतर पुण्यातील वातावरण तापलेय.  डॉ. तावरे कोणाची नावे घेणार याकडे लक्ष लागले आहे.  तावरेनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी अतुल घटककांबळे नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याशिवाय त्यानेच या डॉक्टरला पैसे पुरवल्याचे समोर आले आहे. त्यांनी या प्रकरणात एका लोकप्रतिनिधीचेही नाव घेतले असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

कल्याणीनगर कार दुर्घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांना तपासात समोर आले आहे. सुरुवातीला पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींना ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टरांना पैसे देऊन थेट रक्ताचे नमुने बदलून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणीनगर अपघातप्रकरणी पोलिसांकडून तपास अधिक वेगानं करण्यात येत आहे.

तो लोकप्रतिनिधी कोण?

कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी डॉ.अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी एका लोकप्रतिनिधीने अल्पवयीन आरोपीला मदत केल्याचे डॉक्टर तावरे यांना सांगितल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा लोकप्रतिनिधी कोण? याबाबत पोलिसांना विश्वसनीय माहिती मिळाली असली, तरी पोलिस नाव सांगण्यास नकार दिलाय. पोलिसांनी याप्रकरणी वेगानं तपास सुरु केलाय. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने डस्टबिनमध्ये टाकल्याचे पोलिस तपासात उघड झाले. 

अजय तावरेला अटक कशी झाली ?

ससून रुग्णालयातून पहिलाच रिपोर्ट अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा आल्याने संशय बळावला. ११ वाजल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालात अल्पवयीन आरोपीने नशा न केल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले. खबरदारी म्हणून दुसरी वैद्यकीय तपासणी आणि डीएनए टेस्ट औंधमधल्या सरकारी रुग्णालयात करण्यात आली. औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पोहोचवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आलं.पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळणोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितलंय.पुणे पोलिसांनी अखेर रात्री उशिरा दोघांना राहत्या घरातून अटक केलीय.

नामदेव कुंभार हे मागील नऊ ते दहा वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. क्रीडा, राजकारण, समाजकारण, शेती, चित्रपट, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये आवड आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CNG PNG Price Hike Pune: पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
पुणेकरांना पुन्हा महागाईचा फटका; सीएनजी अन् पीएनजीच्या दरात तिसऱ्यांदा वाढ, डिझेल आणि एटीएफ बाबतच्या निर्णयानंतर पेट्रोल-डिझेलही महागणार?
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
धक्कादायक! पुण्यात तरुणीला धरणाच्या कालव्यात ढकललं, तरुणानेही उडी मारली; पोलिसांनी आरोपीला पकडलं
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
Tukaram Mundhe: पुण्यात नव्या दुचाकीची खरेदी, मिठाईतून 7 जणांना विषबाधा; थेट तुकाराम मुंढेंशी संपर्क अन् स्वीट मार्ट सील
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Nagpur Crime News: प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
प्लॉट खरेदीचा बहाणा, अश्लील व्हिडिओ, धर्मांतराचा दबाव; भेटायला बोलावून नको ते केलं अन्..., वायुसेना अधिकाऱ्याच्या पत्नीसोबतच्या 'त्या' घटनेने नागपूर हादरलं
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
शिर्डी साईचरणी वर्षभरात भरभरुन दान; पण गतवर्षीच्या तुलनेत कमी, देवस्थानच्या एकूण ठेवी, सोनं-चांदी किती?
Pratap Sarnaik: 'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
'ऑपरेशन टायगर सुरूच असतं, कोणाला त्यांच्या पक्षात आवडत नसेल तर आमचे दरवाजे कायम खुले'; मंत्री प्रताप सरनाईकांच सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
धक्कादायक! खराब रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू, ग्रामस्थांचा संताप
Chandrapur Congress: धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
धानोरकर गटातील सर्व 16 नगरसेवकांना अपात्र घोषित करा; काँग्रेस गटनेते राजेश अडुर यांची आयुक्तांकडे मागणी, चंद्रपूर महापालिकेतील गटनेते पदाचा वादाचा नवा अंक!
Sanchita Ugale Co Star Ujjawal Sharma: लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
लिव्ह-इनमध्ये होती संचिता उगले? को-अॅक्टरनं कुणालाही माहीत नव्हतं 'ते' सांगितलं, म्हणाला, 'ती Ex मुळे टेन्शनमध्ये होती...'
Embed widget