Pune-Indapur Teacher Resign: याला म्हणतात सच्चा कार्यकर्ता! उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी इंदापूरतील शिक्षकाने थेट नोकरी सोडली
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले असतानाच उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी एका शिक्षकाने राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे.
Pune-Indapur Teacher Resign: एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेला खिंडार पडले असतानाच उद्धव ठाकरेंना साथ देण्यासाठी एका शिक्षकाने राजीनामा दिला आहे. दीपक पोपट खरात असे राजीनामा देणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षकाने उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. 27 जुलैला उद्धव ठाकरेचा वाढदिवस झाला आणि त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून दीपक खरात यांनी शिक्षक नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ शिवसेनेचे काम खरात करणार आहेत.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे खरात यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. गेली 10 वर्ष दीपक खरात हे शिवसेनेचं काम करीत होते. परंतु त्यांना पुर्ण वेळ काम करता येत नसल्याचं खरात सांगतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांचं राजीनाम्याच पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी 27 तारखेला दीपक खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊन एक अनोखी भेट उद्धव ठाकरेंना दिलीं आहे. खरातांच्या राजीनाम्याचे पत्र सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहे.
दीपक खरात हे वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात ते कार्यरत होते. एक फेब्रुवारी 2002 पासून ते सेवेत आहेत. सध्या वालचंदनगर येथील पाठशाळा क्र. 3 येथे प्राथमिक शिक्षक म्हणून उपशिक्षक पदावर ते कार्यरत होते. त्यांची आतापर्यंतची सेवा 20 वर्ष सहा महिने झाले. अनेक जण शिवसेनेला सोडून गेले आहेत तर अनेक जण नव्याने सेनेत प्रवेश करीत आहेत.. मात्र उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी नोकरीचा राजीनामा देणारा बहुधा राज्यतील हा पहिलाच शिक्षक असावा. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
राजीनाम्यात नक्की काय लिहिलंय?
आपल्या वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड, संचालित संस्थेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मी दि.01/02/2002 पासून सेवेत मसून सध्या वालचंदनगर पाठशाळा क्र.3 मध्ये प्राममिक शिक्षक म्हणून उपशिक्षक या पदावर सेवेत आहे. माझी एकूग अर्हताकारी सेवा आजअखेर 20 वर्षे 6 महिने झालेली आहे. शिवसेना यक्षप्रमुख मा. श्री. उदव बाळासाहेब ठाकरे यांना पाठींबा दर्शवून "शिवसेना' या पक्षसंघटनेचे पूर्णवेळ कम करणे या कारणास्तव मी माझ्या नोकरीचा राजीनामा स्वेच्छेने आज दि.27/07/2012 रोजी देत आहे. आजवर आपल्या संस्थेत, शाळा व्यवस्थापकाचे, अधिकारी, मुख्याध्यापकांचे, सरकारी शिक्षकांचे जे सहकार्य लाभले त्याबद्दल आभार मानतो. माझा राजीनामा मंजूर करण्यात यावा ही विनंती करतो.