Pune Gram Panchayat Election : पुण्यात भाजप अन् अजित पवार गटात तगडी टक्कर; ग्रामपंचायत कोण काबीज करणार अन् कोण उधळणार गुलाल?
Pune Gram Panchayat Election Result 2023 : पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतसाठी आज मतमोजणी होणार आहे आणि गावाचा कारभारी ठरणार आहे. त्यामुळे पुण्यात अनेक महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यात 231 ग्रामपंचायतसाठी (Gram Panchayat Elelction) निवडणूक पार पडली. आज मतमोजणी होणार आहे आणि नंतर गावाचा कारभारी ठरणार आहे. त्यामुळे पुण्यात अनेक महत्वाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. काटेवाडी, बावडा या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध
पुण्यात 231 ग्रामपंचायतीमध्ये 37 ग्रामपंचायतींची निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली. तर 231 ग्रामपंचायत पैकी 49 ग्रामपंचायतींंमध्ये सरपंच बिनविरोध निवडले गेलेत याचा अर्थ 231 पैकी बारा ग्रामपंचायती अशा आहेत ज्या ग्रामपंचायतींमध्ये फक्त सदस्यांच्या निवडीसाठी मतदान झालं. त्यांचे सरपंच हे बिनविरोध निवडले गेले. या सगळ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे.
पुण्यातल्या चुरशीच्या लढती कोणत्या?
- पुणे जिल्ह्यातील इंटरेस्टिंग लढतींमध्ये बारामतीच्या काटेवाडी ग्रामपंचायतचा समावेश होतो. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पॅनलच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.
- इंदापूर तालुक्यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मतदान बावडा ग्रामपंचायतीमध्ये आहे. मतदानानंतर त्यांनी जिंकण्याचा दावा केला, त्या ठिकाणी देखील हर्षवर्धन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
- पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांचे मतदान आहे. मात्र, अमोल कोल्हेंनी तब्येतीच्या कारणास्तव मतदान केलं नाही. दरम्यान, आता जुन्नर कोणाच्या ताब्यात जाणार याकडे लक्ष लागलं आहे.
- खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते यांचे मतदान त्यांच्या सेल पिंपळगाव गावातील ग्रामपंचायतमध्ये आहे ही ग्रामपंचायत आमदार दिलीप मोहिते जिंकणार का याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष असेल.
- भोर, मुळशी, मावळ या पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
- दौंड तालुक्यातील केडगाव, कुरकुंभ, पारगाव, मलठण, खोपोडी, वाटलूज, पांढरेवाडी, वाखारी, पानवली, वडगाव बांडे आणि नायगाव या अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी पानवली आणि वाटलूज या दोन ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
- पुरंदर तालुक्यातील 15 पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत, तर 12 ग्रामपंचायतसाठी पार पडलं आहे.
बारामतीत चित्र कसं असेल?
बारामती तालुक्यातील एकूण 32 ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून यातील मानाप्पावस्ती ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. इंदापूर तालुक्यात 6 तर दौंड तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीपैंकी वाटलुज आणि पाणवली या 2 ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून पुरंदर तालुक्यात 15 पैंकी वाल्हे आडाचीवाडी आणि सुकलवाडी या 3 बिनविरोध झाल्या असून 12 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडणार पडलं.
महत्वाच्या इतर बातम्या :