एक्स्प्लोर

पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप दिला जाणार आहे. त्यात पुण्यातले गणपती म्हणजे बातच न्यारी. गणेशोत्सव आणि पुणे म्हणजे अनोखा माहौल.

पुणे : दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पांना आज निरोप देण्यात आला. त्यात पुण्यातले गणपती म्हणजे बातच न्यारी. गणेशोत्सव आणि पुणे म्हणजे अनोखा माहौल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असो वा मानाचे पाचही गणपती. त्यांच्या मिरवणुकांचा थाटमाट अफाट असतो. पुण्यात मानाच्या पाचही गणपतींचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर आज पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. अतिशय मनमोहक नक्षींनी हा रथ सजला होता. मोती रंगाच्या 27 हजार दिव्यांनी उजळलेला हा रथ डोळे दिपावणारा होता. त्यावर रंगीबेरंगी कोरीवकाम केलेले 5 कळस बसवण्यात आले होते. तब्बल 225 आकर्षक झुंबर रथावर लावण्यात आले होते. विवेक खटावकर यांनी साकारलेल्या श्री विश्वविनायक रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक चार तास आधी निघाली. अखेर पहाटे पाच वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन झालं. मानाचे पाच गणपती पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या आकर्षणाचं केंद्र म्हणजे मानाचे पाच गणपती. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाचही मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि आता विसर्जनसाठीही राज्यभरातून गणेशभक्त पुण्यात येतात.

L I V E - U P D A T E

  • पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पहाटे पाच वाजता विर्सजन झालं. नेहमीपेक्षा यावर्षी दगडूशेठ गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक जवळपास चार तास आधी सुरु झाली होती. दरवर्षी दगडूशेठ गणपतीला मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी रात्रीचे दोन वाजतात. मात्र यंदा दगडूशेठच्या पुढे असलेल्या गणेश मंडळांना, ती मंडळे डीजे वापर करत असल्या कारणानं लक्ष्मी रस्त्यावरुन हटवण्यात आलं. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचं यंदा लवकर विसर्जन झालं.
  • श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नेहमीपेक्षा चार तास लवकर गणपती मिरवणुकीत सहभागी
  • मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचं संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन
  • मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचं संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन
  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचं संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन
  • मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचं संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन
  • मानाचा पहिला कसबा गणपतीचं दुपारी 4.05 वाजता विसर्जन
  • मानाचा पहिला गणपती कसबा गणपती अलका चौकात दाखल
  • मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती समोरची पथकं बेलबाग चौकात दाखल
  • कसबा गणपतीसमोर परदेशी नागरिक मिरवणुकीत सहभागी
  • मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती लक्ष्मी रोडवर
  • मानाचा पाहिला कसबा गणपती लक्ष्मी रोडवर मार्गस्थ, तर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती बेलबाग चौकात
  • मानाचे चार गणपती महात्मा फुले मंडईतून मार्गस्थ
  • VIDEO : पुण्यातील रस्त्यांवर भव्य आणि आकर्षक रांगोळ्या

1) मानाचा पहिला कसबा गणपती सकाळी 9 वाजता मंडपातून बाहेर 10 वाजता मंडई जवळ आगमन 10.30 पालकमंत्री आणि महापौरांच्या हस्ते पूजा 10.40 मिरवणुकीला सुरुवात दुपारी 3.10 ला अलका टॉकीज चौकात दाखल दुपारी 4.05 वाजता विसर्जन पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन 2) मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सकाळी 9.15 वाजता मंडपाबाहेर 10.45 वाजता मंडई जवळून मिरवणुकीला सुरुवात 3.50 वाजता अलका टॉकीज चौकात आगमन संध्याकाळी 4.55 वाजता विसर्जन पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन 3) मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती सकाळी 9.30 वाजता मंडपाबाहेर 10.45 वाजता मंडई जवळ 11 वाजता मिरवणुकीला सुरुवात संध्याकाळी 5 वाजता अलका टॉकीज चौकात आगमन संध्याकाळी 5.30 वाजता विसर्जन पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन 4) मानाचा चौथा तुळशीबाग गणपती सकाळी 9.45 वाजता मंडपाबाहेर 11 वाजता मंडई जवळ 11.15 वाजता मिरवणुकीला सुरुवात संध्याकाळी 6.45 वाजता विसर्जन विसर्जन वैशिष्ट्य: महिलांचं लेझीम पथक, मल्लखांब प्रात्यक्षिक पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन 5) मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा (125 वं वर्ष) 10 वाजता मंडपाबाहेर 11.45 मिरवणुकीला सुरुवात संध्याकाळी 7.10 वाजता विसर्जन पुण्यात मानाच्या गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन
  • पुण्यात मोठ्या उत्साहात गणपतीच्या मिरवणुकांना सुरुवात
  • मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीही मंडईजवळ दाखल
  • मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडईजवळ दाखल
  • मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात
  • VIDEO : अल्का टॉकीज परिसरात 90 फुटांची भव्य रांगोळी
  • मानाचा पहिला कसबा गणपतीचं महात्मा फुले मंडईत आगमन, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापौर मुक्ता टिळक उपस्थित
  • थोड्याच वेळात मानाचा पहिल्या कसबा गणपतीची पूजा पालकमंत्री आणि महापौर यांच्या हस्ते होऊन मिरवणुकीला सुरुवात होईल
  • जिथून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, त्या महात्मा फुले मंडईच्या ठिकाणी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांचं आगमन
  • विसर्जन मिरवणुकीसाठी सुरक्षा :
    • 8000 पोलीस तैनात
    • ठिकठिकाणी सीसीटीव्हीची नजर
    • 17 प्रमुख रस्ते बंद
  • पुण्यात विसर्जनाची तयारी :
    • यंदा सहा लाख गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना
    • 210 ठिकाणी विसर्जनाची सोय, त्यामध्ये
    • 22 विसर्जन घाट, 22 नदी पात्र, 7 विहीर, कॅनॉल 28, कृत्रिम हौद 46, लोखंडी टाक्या 82
    • प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी
    • नदी वरील विसर्जन ठिकाणी जीवरक्षक
  • VIDEO : पुण्यात गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला वेग
  • डीजे आणि स्पीकरवरच्या बंदीनंतर पुण्यातील काही गणेश मंडळं आक्रमक झाली आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत सव्वाशेहून अधिक मंडळं गणेशमूर्तींचं विसर्जन करणार नाहीत. ही मंडळं बाप्पाची मूर्ती मंडपातच ठेवणार आहेत.
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 16 March 2025Special Report | Beed Crime | बीडमध्ये चालकाला डांबून ठेवत जबर मारहाण, हत्येनंतरची ऑडिओ क्लिप व्हायरलSpecial Report | Beed Teacher Story | परिस्थिने हताश केलं, शिक्षकांने मृत्यूला कवटाळलं; धनंजय नागरगोजेंची मन हेलावून टाकणार पोस्टBhaskar Khatgaonkar : काँग्रेसचे भास्करराव खतगावकर राष्ट्रवादीच्या वाटेवर, शिंदेंकडून पण होती ऑफर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
मुंबई विमानतळावर 8 कोटींचं सोनं जप्त; ED च्या छाप्यात एअरपोर्ट कर्मचारीच गोत्यात
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठीच आहे का? मंत्री हसन मुश्रीफांना महिलेचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
तीच माझी भूमिका, औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
शिवसेना नेत्याने बंद पाडले तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातील नॉनव्हेज हॉटेल, कारवाई करण्याची मागणी 
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
आमदाराकडून त्रास होत असल्याची चिठ्ठी, ग्रामसेवकाच्या पत्नीने प्यायलं औषध; पोलिसात तक्रार दाखल
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
सुरेश धस खोक्याच्या घरी, आईसह पत्नीचा आक्रोश; आमदारांचा वन विभागाला इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2025 | सोमवार
North Macedonia Nightclub Fire : नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
नाईट क्लबमध्ये म्युझिक काॅन्सर्टमध्ये आतषबाजी करताच आग लागली, 50 होरपळून मेले; 100 जखमी
Embed widget