एक्स्प्लोर
पुण्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी भाविक सज्ज
पुणे : आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरही सज्ज झाले आहेत. गणपती बाप्पाचं विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडावं यासाठी पोलीस दल, महापालिका कर्मचारी, अग्निशमन पथक इत्यादी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. नैसर्गिक विसर्जन स्थळांशिवाय पालिकेकडून कृत्रिम तलावही उभारण्यात येत आहेत.
यंदा पुणेकरांनी गणपती विसर्जनादरम्यान पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही मानाच्या गणपतींचं नदीऐवजी हौदातच विसर्जन केलं जाणार आहे. तसंच जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेशभक्तांना अमोनियम बायकार्बोनेटचं वाटप करण्यात आलं आहे.
पुण्यातल्या मंडई गणेशोत्सव मंडळानं यंदा 124 वर्षे पूर्ण केली आहेत. विसर्जनासाठी मंडई मंडळाकडून तयार करण्यात येणारा रथ हा संपूर्ण पुण्यासाठी आकर्षणाचा विषय असतो. यावेळी मंडळानं बाप्पाच्या विसर्जनासाठी वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवणारा भक्तीरथ तयार केला आहे.
पुण्यातल्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची विशेष रथातून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या रथाच्या रोषणाईसाठी विशेष एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या :
LIVE: दहा दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाचं विसर्जन
बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाची तयारी, मुंबईतल्या चौपाट्यांवर ड्रोनची नजर
पुढच्या वर्षी बाप्पांचं आगमन लवकर, मुक्कामही बारा दिवस
मुंबई-पुण्यात गणरायांच्या विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट
अरबी समुद्रात लालबागच्या राजाचं हायटेक विसर्जन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement