एक्स्प्लोर
पुण्यातील मैत्रिणींच्या आत्महत्येचं गूढ उकलण्यात यश
पुणे : पुण्यातल्या कासेवाडीतल्या तीन मैत्रिणींच्या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. प्रियकरांनी लग्नाला नकार दिल्यानं निराश झालेल्या या मैत्रिणींनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
तरुणींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी रविवारी दोन तरुणांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत ही माहिती उघड झाली आहे. राहुल गोफणे आणि सोहेल शेख अशी या दोघांची नावं आहेत. त्यांचा तिसरा मित्र अद्याप फरार आहे.
आत्महत्या केलेल्या तिघींना या तीन तरुणांनी लग्नाचं वचन दिलं होतं. त्यासाठी त्या घरातून पळून कॅनॉलवर त्यांची वाट पाहत होत्या. मात्र तिघेही जाणीवपूर्वक तिथे गेले नाहीत.
पुण्यात तीन अल्पवयीन मुलींची आत्महत्या
मित्र न आल्यामुळे निराश झालेल्या तिघींना आत्महत्या केली. या आशयाचा मेसेज तिघींनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी या मुलांना पाठवला होता. मात्र तीन मैत्रिणींपैकी एक अजूनही बेपत्ता असल्यानं तिचा शोध सुरु आहे. श्रुती वाघमारे, अबेदा शेख, मुस्कान मुलतानी अशी मृत मुलींची नावं आहेत. यापैकी श्रुती वाघमारे आणि अबेदा शेख यांचा मृतदेह मिळाला असून मुस्कानचा मृतदेह सापडलेला नाही.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement