एक्स्प्लोर

मोठी बातमी : पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास लायसन्स रद्द, पोलिसांचा मोठा निर्णय

Pune drunk and drive Marathi News: पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे.

Pune drunk and drive Marathi News पुणे: पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह (drunk and drive) घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पुण्यात गेल्या 6 महिन्यात 1648 जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले पाठवून त्यांच्यावर कारवाई केली जात होती. मात्र यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिने रद्द केले जाईल, त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर 6 महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार मात्र तिसऱ्या वेळीस पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

चालयचीसुद्धा भीती वाटतेय-

पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघाच्या अनेक घटना घडल्या असून, यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे धाबे दणाणून सोडणाऱ्या या वेग बहाद्दरांमुळं रस्त्यावरून चालयचीसुद्धा भीती वाटू लागली आहे, अशाच प्रतिक्रिया सध्या पुण्यातील नागरिकांनी देण्यास सुरुवात केली आहे. 

पुण्यात नेमकं चाललंय काय?

विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात (Pune Crime) नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणेकर (Pune News) सोडाच पण पुण्याती पोलीस तरी सुरक्षीत आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. पुण्यातील पोर्शे कार अपघाताची दाहकता कायम असतानाच काही दिवसांपूर्वी चेक पॉईंटवर चेकींग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर पेट्रोल (Petrol) ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता. अशातच आता चेक पॉईंटवर गाडी अडवल्याचा राग आल्यानं नोकरी कशी करतोस, तेच बघतोच, असं म्हणत थेट पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुणं सुरक्षित तर आहे ना? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय. 

संबंधित बातमी:

Pune News: सुसंस्कृत पुण्यात पोलीसच असुरक्षित? गाडी अडवली म्हणून संतापलेल्या दोघांची पोलिसाला जबर मारहाण

दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड, भरधाव स्विफ्टच्या धडकेत समाधान कोळींचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget