(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड, भरधाव स्विफ्टच्या धडकेत समाधान कोळींचा मृत्यू
दापोडीत दोन पोलिस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक देऊन पळालेली गाडी स्वीफ्ट डीझायर कार असून पोलिसांनी कार चालकाला पुण्यातून कारसह ताब्यात घेतलंय
पुणे : पुण्यात जुन्या पुणे-मुंबई महामार्गाजवळ झालेल्या हिट अँड रनच्या (Pune Hit And Run) प्रकरणानं सगळीकडे खळबळ माजली आहे.एका वाहनानं दोन पोलिसांना चिरडलं. या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दापोडीत पोलिसांना धडक देणाऱ्या कारचालकाचं नाव उघड झाले आहे. दापोडीतील अपघातग्रस्त कारचालकाचं नाव सिद्धार्थ केंगार आहे. दापोडीत हिट अँड रनमध्ये हवालदार समाधान कोळींचा मृत्यू झाला आहे.
दापोडीत दोन पोलिस कॉन्स्टेबलच्या दुचाकीला धडक देऊन पळालेली गाडी स्वीफ्ट डिझायर कार असून पोलिसांनी कार चालकाला पुण्यातून कारसह ताब्यात घेतलंय. हा अपघात जेव्हा घडला तेव्हा त्याच भागातून पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार जाताना सीसीटीव्हीमधे दिसली होती. जी मुंबईतून अपघातग्रस्त होऊन आली होती. त्यामुळे त्या इनोव्हा कारने अपघात घडला असावा असा अंदाज पोलिसांनी आधी व्यक्त केला होता. मात्र पुढे तपासात स्विफ्ट कारने धडक दिल्याने पोलिस कॉन्स्टेबल समाधान कोळींचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. सिद्धार्थ केंगार (24 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी अटकेत असून वाहन पण ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. आरोपीचे ब्लड घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
हिट अँड रनची दुसरी घटना पिंपळे सौदागर येथे घडली
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर गस्तीवरच्या पोलिसांना उडवले. पी सी शिंदे गंभीर जखमी आहे. तर हिट अँड रनची दुसरी घटना पिंपळे सौदागर येथे घडली आहे. गणेश शिंदे या चालक कॉन्स्टेबलला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गणेश शिंदेंचा जागेवरच मृत्यू झाला आहे. गणेश शिंदे हे पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर भागातून दुचाकीवरुन निघाले असताना आज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यातही बड्या बापाच्या पोराचा धिंगाणा
पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन होता. अपघातापूर्वी त्याने मित्रांसोबत पार्टी केली आणि नंतर गाडी स्वतः चालवली. अडीच कोटींच्या पोर्शे कारने दोघांना उडवले. बाप बडा उद्योजक, वाचवायला पैसा ओतला. पुण्याचं पोर्शे कारचं प्रकरण असो की वरळीचं बीएमडब्लू कारच्या अपघाताचं प्रकरण असो, अशा सगळ्या बड्या बापांच्या लाडोबांमुळे अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच हिट अॅण्ड रन प्रकरणातील कायदे आणखी कडक करत दोषींना कायद्याच्या कचाट्यात घालून चांगलं सुजवण्याची गरज निर्माण झालीय. अन्यथा ही अशी बड्या बापांची मुले रस्त्यांवरील नागरिकांना अशीच चिरडत राहतील आणि अपघातानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करत हात चोळत राहू. काही दिवसांनंतर तेही विसरून जावू.
हे ही वाचा :