Pune Drugs Case of PSI : पुण्यातील पीएसआयला झटपट पैसे कमावण्याचा हव्यास नडला, 45 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात बेड्या
Pune : पुणे ड्रग्स प्रकरणाने (Pune Drugs Case) हादरले असतानाचं, पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला ड्रग्स प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
Pune : पुणे ड्रग्स प्रकरणाने (Pune Drugs Case) हादरले असतानाचं, पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाला ड्रग्स प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यामुळं गृह विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक विकास शेळकेच्या (Vikas Shelake) अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. शेळकेकडे 45 कोटींचे 45 किलो मेफेड्रोन ड्रॅग आले कुठून? तो ड्रग्सची विक्री कधी पासून करत होता? शेळकेच्या टोळीत नेमके किती जण आहेत? या प्रश्नांचा छडा आता पोलीस (Police) तपासात लागणार आहे. आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या घटनाक्रमावर एक नजर टाकूयात.
काय आहे प्रकरण?
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Pune-Mumbai Highway) तीन दिवसांपूर्वी एक अज्ञात वाहन पुण्याच्या दिशेने येत होते. देहू रोड ते निगडीतील भक्ती शक्ती चौक दरम्यान त्या अज्ञात वाहनातून एक पोतं खाली पडलं. त्यावेळी एक टुरिस्ट त्या दिशेने प्रवास करत येत होता. त्याने हे साहित्य आपल्याकडे घेतले. आणि पुढे नाकाबंदी साठी असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले.
वरिष्ठांना कळवण्याऐवजी शेळकेने एमडीची विक्री करण्याचा डाव
नाकाबंदीला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पोतं निगडी पोलीस स्टेशनला आणलं. तिथं पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके ड्युटीवर होता. त्याने ते पोतं उघडलं मेफेड्रोन ड्रग सापडलं. तब्बल 45 कोटींचे ते ही 45 किलो एमडी पाहून शेळकेचे डोळेच फिरले. पीएसआयने वरिष्ठांना कळवण्याऐवजी शेळकेने या एमडीची विक्री करण्याचा अन् मालामाल होण्याचा प्रयत्न सुरु केला.
आरोपींचा शोध घेण्याऐवजी ड्रग्ज विक्रीसाठी माणूस शोधला
आरोपींचा शोध घेण्याऐवजी, त्याने या ड्रग्सच्या विक्रीसाठी माणूस शोधायला सुरुवात केली. नमामी शंकर झा आणि पीएसआयची भेट झाली. नमामी हा एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा. शेळकेची त्याच्यासोबत आधीपासूनच ओळख होती. मग शेळकेने नमामीला कोट्यधीश होण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला तो ही बळी पडला. त्यानंतर एक मार्चला नमामी 45 किलो पैकी दोन किलो एमडी घेऊन विक्रीसाठी बाहेर पडला. पीएसआय शेळकेचं याचा सूत्रधार असल्यानं नमामी ला वाटलं, आता पोलिसांच्या हाताला आपण काय लागणार नाही. मात्र पोलिसांना ही खात्रीलायक खबऱ्याने नमामी बद्दल आधीच कल्पना दिली होतीच. त्यानुसार सांगवी पोलिसांनी रक्षक चौकात सापळा रचण्यात आला.
पीएसआयला पोलिसांकडून बेड्या
या सापळ्यात नमामी ला रंगेहाथ बेड्या ठोकण्यात आल्या आणि पीएसआय शेळकेचे बिंग फुटले. ज्या पोलीस आयुक्तालयात शेळके कार्यरत होता, त्याच पोलिसांनी शेळकेला गजाआड केलं. आता शेळके ने ड्रग्स विक्रीसाठी आणखी कोणाला संपर्क केला होता का? आणि ज्या अज्ञात वाहनातून ड्रग्सचं पोतं खाली पडलं होतं. त्या अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. ते वाहन पोलिसांच्या हाती लागल्यावर, त्या वाहनात आणखी किती कोटींचे ड्रग होतं आणि त्यामागे कोणती टोळी सक्रिय आहे. याचा उलगडा होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या