एक्स्प्लोर

Sujay Vikhe Patil: मी कायमचा इकडेच येईन! भाजपची पहिली लोकसभा उमेदवार यादी जाहीर अन् सुजय विखे-पाटलांचा सूर बदलला

Loksabha Election 2024: भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर. महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. महाराष्ट्रातून भाजप कोणाला उमेदवारी देणार, याबाबत सस्पेन्स कायम आहे.

अहमदनगर: भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 195 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. अशातच अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुजय विखे-पाटील यांना भाजपकडून (BJP) लोकसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची कुजबूज सुरु झाली आहे. सुजय विखे पाटील यांनी अहमदनगरच्या जनतेशी संवाद साधताना, 'तुम्ही खासदार करुन मला दूर लोटलंत. थोडे दिवस थांबा, मी कायमचा इकडे येईन', अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का, याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

सुजय विखे-पाटील नेमकं काय म्हणाले?

सुजय विखे-पाटील शनिवारी शिर्डीच्या नजीक असलेल्या राहता येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला बचत गटाच्या कार्यक्रमावेळी बोलत होते. यावेळी सुजय विखे यांनी उपस्थितांशी संवाद साधतान म्हटले की, "शिर्डी मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने मी खासदार झालो. मात्र, तुमच्यापासून दुरावला गेलो आहे. दोन महिने होऊ द्या. नंतर मी कायमचा इकडेच (शिर्डी) येईल. काळजी करु नका.", असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले. सुजय विखे-पाटील यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुजय विखे यांची ही बदललेली भाषा म्हणजे त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, याबद्दल कुणकुण लागल्याचा परिणाम आहे किंवा त्यांना यंदाच्या लोकसभेला निवडून येण्याबाबत साशंकता वाटत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

सुजय विखे बॉलीवूडच्या गाण्यावर थिरकतात तेव्हा....

जागतिक महिला दिनानिमित्त अहमदनगरच्या  शेवगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सवात भाजप खा. सुजय विखे-पाटील "मैं हू डॉन..." गाण्यावर ठेका धरताना दिसले. सुजय विखेंचा हा डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातोय. जागतिक महिला दिनानिमित्त भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. शेवगाव येथे कार्यक्रमात सुदेश भोसले यांनी गायलेल्या "मै हू डॉन" गाण्यावर सुजय विखेंनी ठेका धरला. 

आणखी वाचा

खासदार सुजय विखे पाटील आणि गौरव मोरे यांचा 'वन-टू- का फोर' गाण्यावर जबरदस्त डान्स; पाहा व्हिडीओ

मोठी बातमी: भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी-शाहांकडून कोणाला संधी?

महत्त्वाच्या बातम्या

'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'रामा शेट्टी'च्या गावातील 6 दशकांची 'जहागिरदारी' अन् पती -पत्नीच्या हातातील 'गवती चहाचा' जादुई मोह, अमरापूरमध्ये चहाप्रेमींची अजब झुंबड
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
Lokshahir Annabhau Sathe : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी, सरकारने मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याची मागणी

व्हिडीओ

Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget