एक्स्प्लोर

Vaishnavi Hagawane Death: 51 तोळं सोनं, चांदीची भांडी अन् फॉरच्युनर कार; शरीरावर 19 जखमा, जागेसाठी दोन कोटींची मागणी राष्ट्रवादीचे राजेंद्र हगवणे मुलासह फरार

Vaishnavi Hagawane Death: आत्महत्या केलेल्या सूनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. 16 मे) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवी यांनी आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे. शुक्रवारी 16 मे रोजी दुपारी साडे‑चारच्या सुमारास वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला आहे. आत्महत्या केलेल्या सूनेच्या आईवडिलांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केलाय. हुंड्यासाठी आपल्या लेकीचा छळ सुरू होता. त्यातून तिने आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या आई-वडिलांनी केला आहे

मृत्यूच्या सहा महिने आधी जावेने दिलेली पोलिस तक्रार

ज्याप्रमाणे हगवणे कुटुंबीयांने घरातील लहान सुनेचा अमानुषपणे छळ केला, त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं, अगदी असंच काहीसा मोठ्या सुनेचा ही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला. नोव्हेंबर 2024 मध्ये हगवणेंच्या मोठ्या सुनेने पौड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती, त्याबाबत गुन्हा ही दाखल केलाय. सासरे राजेंद्र यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि मनास लज्जा निर्माण होईल असं कृत्य केलं. मात्र तेव्हा ही राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली नसती. आता एवढं होऊन ही अजित पवारांचे पदाधिकारी असलेले सासरे राजेंद्र पोलिसांच्या हाती लागेना झालेत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी

राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी मुलीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉरच्युनर गाडी, चांदीची भांडी घेतली. एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या ठिकाणी लग्न करुन देण्याच्या बोलीवर मुलीशी लग्न करुन दिलं, अशी माहिती एफआयरमधून समोर आली आहे.त्याचबरोबर ते सर्वजण कोणत्याही कारणात्सव वाद घालून तिच्याबरोबर भांडण करत. लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागीतली ती दिली नाहीत म्हणुन त्याचा राग मनात धरुन सून वैष्णवीस घालुन पाडुन बोलून तिचे चारित्र्यावर संशय घेत सासु लता, नंनंद करीश्मा हागवणे, सासरे राजेंद्र हागवणे, दिर सुशील हगवणे यांनी शारीरीक व मानसिक त्रास देणं सुरू केलं, अशी माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे.

हे बाळ माझे नाही...

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असताना याची माहिती पती शशांक याला सांगितली असताना त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेवून हे बाळ माझे नाही दुसऱ्या कोणाचे तरी असेल असे म्हणून पती शशांक व सासरचे लोकांनी तिच्यासोबत भांडण करुन तिला मारहाण केली होती. त्यामुळे शशांक याने वैष्णवी हीस जबरदस्तीने शिवीगाळ व मारहाण करुन माझ्या घरातून चालती हो, नाहीतर मी तुला हाकलुन देईन असे म्हणुन राहते घरातुन हाकलून दिले होते. त्यानंतर वैष्णवी ही माहेरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत होत असलेल्या छळवणुक व हुड्यासाठी पैशाची मागणी याबाबतची माहिती तिच्या आईवडीलांना दिली होती. त्याचबरोबर सासरच्या कुटुंबियांकडुन मानसिक त्रास सहन न झाल्याने दि. 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळुन औषध (रेंट पॉईझन) जेवणातून खावून स्वःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी

जेव्हा पहिल्यांदा वैष्णवीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, त्यामुळे तिचा जीव वाचला होता, तिच्यावरती 4 दिवस उपचार सुरू असताना तिचे सासरचे कोणतेही नातेवाईक तिला बघण्यासाठी देखील दवाखान्यात गेले नाहीत, त्यानंतर वैष्णवीची तब्येत ठीक झाल्यानंतर तिला पुन्हा सासरी पाठवुन देण्यात आलं. त्यानंतर साधारण 15 दिवसानंतर तिचा पती शशांक याने वैष्णवीच्या माहेरी जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिच्या माहेरून पैसे न मिळाल्याने जावई शशांक यांनी घरी जावुन वैष्णवी हिस 'तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत, तुझ्या बापाला काय भिक लागली काय, मी तुला काय फुक्कट पोसणार आहे काय, तुझ्या बापाने मला पैसे दिले नाहीत तर मी तुझ्या आख्या खानदानाचा काटाच काढतो' असं म्हणत वैष्णवीला धमकी दिली होती. याबाबत वैष्णवीने माहेरी सांगितलं असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. 

शवविच्छेदन अहवालात काय मिळाली माहिती?

पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. डॉ.जयदेव ठाकरे आणि डॉ. ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत. शरीरावरती रक्त साकाळल्याचे डाग आहेत.अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहे. वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईंकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी वैष्णवीच्या हत्येच्या दिशेने तपास करावा, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम, 'आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांनी बोलून ठोस निर्णय घ्या, नाहीतर...'
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Dhruv Rathee on Delhi Police: ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
ध्रुव राठीच्या घराबाहेर 50 जण दबा धरुन बसले, आईने घराचा दरवाजा उघडताच धक्का मारुन आत घुसले अन्....
Yugendra Pawar : 'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
'प्रस्ताव वगैरे असं काही आम्ही तिथं...', युगेंद्र पवारांनी सांगितलं पार्थ, जय पवारांसोबत काय झालेलं बोलणं, म्हणाले, 'एक दोन मिनिटं फक्त या विषयावर आम्ही बोललो'
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Pune News: मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
मित्रांसोबत दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् आक्रित घडलं, चक्कर येऊन बेशुद्ध पडला, तरूणाचा दुर्दैवी अंत
Someshwar Sugar Factory Election : सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; बारामतीत राजकीय वातावरण तापलं, सभासदांच्या कौलाकडे लक्ष, आज मतदान तर उद्या मतमोजणी
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
Embed widget