(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune-Daund Crime news: दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहभाई यांच्या सह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा
राष्ट्रवादी पक्षाचे दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहभाई यांच्या सह 8 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.
Pune-Daund Crime news : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुण्यातील दौंडचे (Daund) माजी नगराध्यक्ष बादशाहभाई यांच्यासह आठ जणांवर अॅट्रॉसिटीचा (Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा विनयभंग करुन केला म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या तीन जणांना तलवारी, कोयते घेऊन मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केली. या कारणावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दौंडचा माजी नगराध्यक्ष बादशाह भाई शेख, इलास इस्माईल शेख, राशीद इस्माईल शेख, अरबाज सय्यद, वाहिद खान, जुम्मा शेख, वसीम शेख, जिलानी शेख व इतर दहा ते बारा जणांवर दौंड पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अधिनियम तीन एक नुसार अॅट्रॉसिटी आणि मारहाणीचा तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड शहरातील कुंभार गल्लीतून पीडित महिला तिच्या आत्याच्या घरुन दळण्याचा डबा घेऊन कुंभार गल्ली येथे गिरणीत ठेवण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिथून परत येत असताना रस्त्यावर राशीद शेख, वाहिद खान, अरबाज सय्यद, बादशहा भाई शेख, जिलानी शेख आणि इतर दहा ते बारा लोक रस्त्यावर उभे होते. रस्त्याने जात असताना राशिद इस्माईल शेख हा समोर आला. त्याने पीडित महिलेच्या अंगावरील ओढणी हाताने ओढून घेतली आणि ती ईलास इस्माईल शेख याच्याकडे फेकली.
पीडित महिला तिथून घाबरुन घरी पळत गेली आणि घरी जाऊन आत्याच्या मुलासोबत चुलत भावाला ही घटना सांगितली. हे तिघेजण पुन्हा राशीद इस्माईल शेख याला जाब विचारण्यासाठी गेले असता या सर्वांनी या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर पुन्हा हे सर्वजण तलवारी आणि कोयते घेऊन घरासमोर आले आणि त्यांनी पीडित महिलेच्या चुलत भावाला तोंडावर मारन जखम केली. आत्याच्या मुलास जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने डोक्याच्या डाव्या बाजूस मारुन गंभीर दुखापत केली.
जातीवातक शिवीगाळ देखील केली
या सगळ्या वादात दोन गट आमने-सामने होतेच मात्र त्यानंतर दोन्ही गट एवढ्यावर थांबले नाही तर त्यांनी आमच्या गल्लीत राहू नका असे सांगत जातीवाचक शिवीगाळ केली. या फिर्यादीवरुन दौंड पोलिसांनी वरील आठ जणांविरोधात अॅट्रॉसिटी, मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.