एक्स्प्लोर

Pune Crime : मुंबईनंतर पुण्यात बंदुकीचा थरकाप; पार्टनरला गोळ्या घालत स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट

Pune Crime : आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे : पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol Murder Case) झालेल्या दिवसाढवळ्या हत्येनंतर सुरु झालेला बंदुकीचा थरकाप सुरुच आहे. कोथरूडनंतर आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल ढमाले अस आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

औंधमधील ज्युपिटर चौकातील प्रकार 

गोळीबार करण्यात आलेला पार्टनर आकाश जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते.  मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते. 

धावत्या दुचाकीवरुन मागून गोळी झाडली

आज (10 फेब्रुवारी) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली. 

शरद मोहोळची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या 

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला आहे. पोलिस यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही? इथपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचला आहे. कोयता गँगने घातलेली दहशत संपत नसतानाच कुख्यात गुंड शरद मोहोळची दिवसाढवळ्या कोथरुडमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर सुरु झालेल्या गोळीबाराचा थरार अजून सुरुच आहे. काल (9 फेब्रुवारी) पोलिस बंदोबस्त असतानाही निखिल वागळे यांची गाडी चारवेळा हातात मिळेल ते फेकून भाजप कार्यकर्त्यांनी फोडल्याचा प्रकार घडला. या पुण्यातील घटना ताज्या असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार करून गंभीर जखमी केले. दोन दिवसांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांची मोरोस नोरोन्हाने त्याच्याच कार्यालयात बोलवून हत्या केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Modi meet Team India:मातीची चव कशी होती?कॅच कसा घेतलास?मोदींची प्रत्येक खेळाडूशी चर्चा UncutCNG Bike | जगातली पहिली CNG बाईक पाहिलीत का? 330 किलीमीटरचं मिळतोय मायलेज!Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP MajhaNitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Embed widget