एक्स्प्लोर

Pune Kothrud Crime: कोथरुड पोलिसांकडून मुलींच्या छळाचा आरोप, पहाटे साडेतीन वाजेपर्यंत रोहित पवार, सुजात आंबेडकर ठाण मांडून बसले, पुण्यात नेमकं काय घडलं?

Pune crime news: तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप. पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा

Pune Crime news: पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींचा छळ करण्यात आल्याची धक्कादायक माहिती रविवारी समोर आली होती. काल या सगळ्याविरोधात पुण्यातील काही संघटना आणि कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही. मात्र, रविवारी रात्री पुण्यातील काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुणे पोलीस आयुक्तालयात (Pune Police) दाखल झाले. हे सर्वजण पुण्यातील पोलीस आयुक्तालयात रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते. अप्पर पोलीस आयुक्त  मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांची पहाटेपर्यंत चर्चा सुरु होती. तरीही पोलिसांनी अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल करुन घेतलेला नाही. यानंतर रात्री साडेतीन वाजता आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, सहकारी आणि  या मुली आपापल्या घरी गेल्या. मात्र, पुण्यातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याप्रकरणात लक्ष घातल्याने मुलींचा छळ करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठीचा दबाव वाढला आहे. राज्य महिला आयोगानेही याप्रकरणाची दखल घेतल्यामुळे सोमवारी दिवसभरात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हे बघावे लागेल.

याप्रकरणी रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली. याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Kothrud Police: कोथरुड पोलिसांनी आरोप फेटाळले

याप्रकरणातील तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी आमच्याविषयी जातीवाचक आणि लैंगिक अपमान करणारी शेरेबाजी केली. तसेच छत्रपती संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक कामठे यांनी एका मुलीच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करु, असे सांगितल आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपयुक्त संभाजी कदम हे या प्रकरणी काय कारवाई करतात, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

तुमची जातच तशी, किती जणांसोबत झोपलात, रां# आहात की लेस्बियन आहात? कोथरुड पोलीस ठाण्यात मुलींच्या छळाचा आरोप

शिवानी पांढरे
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Heat Wave Weather Updates: काळजी घ्या! पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट; 18, 19 तारखेला पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
काळजी घ्या! पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट; 18, 19 तारखेला पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget