एक्स्प्लोर

Pune Crime News: अमेरिकेत उच्चशिक्षण घेणाऱ्या तरुणीने अक्कल गहाण टाकली, ऑनलाईन पूजाअर्चेच्या नावाखाली भोंदूबाबाने लावला 18 लाखांचा चुना

Pune Crime News: अमेरिकेत शिक्षण घेत असताना फोनवरून पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने उच्चशिक्षित तरुणीला 18 लाखाचा गंडा घातला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News: एक उच्चशिक्षित 21 वर्षीय तरुणी जी अमेरिकेतील शिकागो याठिकाणी शिक्षण घेते, ती एका भोंदू बाबाच्या नादाला लागली अन् 18 लाख रूपये गमावून बसल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या फसवणुकी (Pune Crime News) प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात कलम 406, 420 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धार्थ अभयकुमार आमळे (रा.पिंपरी चिंचवड) असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 21 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार नोव्हेंबर 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत घडला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षीय फिर्यादी तरुणी ही अमेरिकेतील शिकागो शहरात शिक्षण घेते. तिला ऑनलाईन पूजापाठ आणि जप करून देतो असे सांगत आरोपीने फिर्यादी तरूणीला विश्वासात घेतलं. तसेच हे पूजापाठ आणि जप करून घरातील अडचणी सोडवतो असंही आरोपीने सांगितले. पूजा झाल्यावर काही रक्कम परत करतो असे आश्वासन सुद्धा दिले होते. या सर्व भुलथापाला बळी पडून तरुणीने आरोपीला 11 लाख 83 हजार रुपये दिेले. 

याशिवाय फिर्यादी जेव्हा भारतात परत आली तेव्हा तिला भेटून तिच्याकडून सोन्याचे दागिने आणि महागडे कपडे सुद्धा घेतले. भारतात आल्यावर फिर्यादीला पिंपरी चिंचवड परिसरात बोलावून तिचा सोन्याचा हार आणि सोन्याच्या बांगड्या असा 5 लाख 59 हजाराचा ऐवज तिच्याकडून काढून घेतला. याशिवाय रोख 2 लाख 82 हजार रुपये देखील काढून घेतली.

दरम्यान या सर्व घटनेनंतर फिर्यादीने आरोपीकडे आजवर दिलेली रोख रक्कम आणि दागिने परत मागितले असता आरोपीने फिर्यादीचे फोटो मॉर्फ (Pune Crime News) करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. या घटनेनंतर फिर्यादींनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bus Boook Modi Event : मोदींच्या कार्यक्रमासाठी तीन दिवस एसटीच्या 760 बस बुकिंगSidco Home Lottery : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सिडकोच्या घरांचा धमाका, 40 हजार गरांची लॉटरी निघणारCongress Protest : काँग्रेसचं नाशिक, नागपुरात आंदोलन आंदोलकांची घोषणाबाजीManoj Jarange Brohters Meet Eknath Shinde : मनोज जरांगेंचा भाऊ  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबीरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Singham Again : बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
बाजीराव सिंघम आणि चुलबुल पांडे एकत्र येणार, दिवाळीत बॉक्स ऑफिसवर डबल धमाका
Rupali Chakankar vs Rohini Khadse : रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, थेट एकमेकांचा बापच काढला!
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Dhule Crime: शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं,  बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
शेजारच्यांना सांगितलं मुंबईला जातो अन् मुलांसह जोडप्याने आयुष्य संपवलं, बहिणीने दार उघडताच अंगाचा थरकाप उडवणारं दृश्य दिसलं
Embed widget