एक्स्प्लोर

Pune Crime News: पुण्यातील टोळक्याला रात्री 1.30 वाजता पिझ्झा खायची लहर, हॉटेलचालकाने नकार देताच दगड उचलले अन्...

Pune Crime News: पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणी केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात गुन्हेगारांना वर्दीची भीतीच राहिली नसल्याचं चित्र दिसून येत आहे.

Pune Crime News:  पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये क्षुल्लक कारणावरून मारहाणी (Pune Crime News) केल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. पुण्यात गुन्हेगारांना वर्दीची भीतीच राहिली नसल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच पुण्यात (Pune Crime News)  पिझ्झा दिला नाही म्हणून हॉटेल चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.  

पिझ्झा न दिल्याने हॉटेल चालकाला मारहाण (Pune Crime News)  केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खराडी परिसरात घडला आहे. ही घटना 28 जुलै रोजी खराडी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय पाचारणे, अमोल सातव, प्रीतम कुलकर्णी, विशाल सातव या चौघांवर (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल बंद करुन मालक निघाला होता. त्यानंतर हे चौघे त्या हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी पिझ्झा मागत होते. हॉटेल मालकाने हॉटेल बंद झाल्याचं सांगितलं याचा राग मनात धरून थेट हॉटेल मालकाला मारहाण (Pune Crime News)  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 28 जुलै रोजी रात्री दीडच्या सुमारास घडली आहे.

जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा केला खून 


काही दिवसांपुर्वी पुण्यात(Pune Crime News) क्षुल्लक कारणामुळे कूक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणाची चव बिघडवल्याने कूकचा उंड्रीमध्ये खून केल्याची माहिती समोर आली आहे. कूकच्या नाकावर आणि डोक्यावरती हातोड्याने वार करून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या खून प्रकरणात कोंढवा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून एकाला पोलिसांनी अटक केली. 

मिळालेल्या माहितीनुसार, कॅम्पमधील कॅन्टीनमध्ये कूक म्हणून काम करणाऱ्या शुभम शास्त्री सरकार नावाच्या कूकच्या नाकावर व डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर हल्ला झालेल्या कूकला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्या असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 20 Sept 2024सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 20 September 2024ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
मुख्यमंत्र्यांचे निर्देश, मंत्री शंभूराज देसाईंनी बोलावली तातडीची बैठक, मराठा, धनगर आणि मातंग समाजाच्या मागण्यांचा आढावा घेणार 
Petrol Diesel Rate : मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल स्वस्त होणार? कधी आणि किती रुपयांची घसरण होणार?
Badlapur Panvel Tunnel: आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
आईशप्पथ! मुंबई ते बदलापूर प्रवास फक्त 40 मिनिटांत, 'या' बोगद्यामुळे पनवेल फक्त 20 मिनिटांत गाठता येणार
तुमच्या पोटातलं  ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
तुमच्या पोटातलं ओठावर आलं, राहुल गांधींनी चैत्यभूमीवर नाक घासून माफी मागावी, खासदार नरेश म्हस्केंचं पत्र 
Horoscope Today 20 September 2024 : आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पितृ पक्षाचा तिसरा दिवस; हा दिवस तुमच्यासाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
आज सुनफा योगासह बनले अनेक शुभ योग; वृषभसह 5 राशींवर राहणार लक्ष्मीची कृपा, अचानक धनलाभाचे संकेत
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Horoscope Today 20 September 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
Embed widget