एक्स्प्लोर
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय तोडफोड : 171 जणांची जामिनावर सुटका
मराठा क्रांती मोर्चातर्फे नऊ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, कोथरूड, चांदणी चौक, हिंजवडी, वारजे अशा विविध भागांमध्ये हिंसाचार झाला होता.
पुणे : मराठा मोर्चादरम्यान हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 171 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चातर्फे नऊ ऑगस्टला पुकारण्यात आलेल्या आंदोलनात पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, कोथरूड, चांदणी चौक, हिंजवडी, वारजे अशा विविध भागांमध्ये हिंसाचार झाला होता.
या हिंसाचारानंतर 194 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 31 जणांची त्याच दिवशी सुटका करण्यात आली, तर दोन जण अल्पवयीन असल्याचं समोर आलं होतं. उरलेल्या 171 जणांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. या 171 जणांची आज प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली.
वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नाही: पोलीस
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. माध्यमांच्या प्रतिनिधिंनाही यावेळी वार्तांकन करण्यापासून रोखण्यात आलं. त्यानंतर चांदणी चौकात पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी अश्रूधुराचाही वापर करण्यात आला.या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झाले.
संबंधित बातम्या :
18-20 वयाच्या मुलांनी तोडफोड केली: पुणे जिल्हाधिकारी
महाराष्ट्र बंद : पुण्यात आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड
मराठा आंदोलनाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मराठा मोर्चात वऱ्हाड, आंदोलनास्थळीच लग्न!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement